एक्स्प्लोर

Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड, Sensex 635 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान

Stock Markets Updates: ऑईल अॅंड गॅस, पॉवर, रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. 

मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस नकारात्मक ठरला असून (Closing Bell Share Market Updates) मोठी पडझड झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 635 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 186 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,067 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,199 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही (Nifty Bank) आज तब्बल 741 अंकांची घसरण होऊन तो 42,617 वर पोहोचला. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल4.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 

शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आले. ऑईल अॅंड गॅस, पॉवर आणि रियल इस्टेट सेक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजार बंद होताना मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. 

Closing Bell Share Market: मुंबई शेअर बाजाराच्या भांडवलामध्ये मोठी घसरण 

आजच्या झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या एकूण भांडवल मुल्यामध्ये घट झाली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचे भांडवल 282.87 लाख कोटी रुपये इतकं आहे. मंगळवारी हे भांडवल 287.39 लाख कोटी रुपये इतकं होतं. 

या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Divis Labs- 4.99 टक्के
  • Apollo Hospital- 3.69 टक्के
  • Cipla- 3.38 टक्के
  • Sun Pharma- 1.75 टक्के
  • HCL Tech- 1.03 टक्के

या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • Adani Enterpris- 6.32 टक्के
  • Adani Ports- 3.01 टक्के
  • IndusInd Bank- 2.19 टक्के
  • Bajaj Finserv- 2.10 टक्के
  • UltraTechCement- 2.08 टक्के

Stock Markets Updates: शेअर बाजाराची सुरुवात तेजीने 

आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 291.42  अंकांच्या तेजीसह 61,993.71  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 49.85 अंकांच्या तेजीसह 18,435.15 अंकांवर खुला झाला. सेन्सेक्सने 62 हजार अंकांचा टप्पाही ओलांडला होता. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढू लागल्याने पुन्हा घसरण दिसू आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 67 अंकांनी वधारत 61,770.06 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 23.85 अंकांच्या तेजीसह 18,409.15 अंकांवर व्यवहार करत होता. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget