एक्स्प्लोर

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात अस्थिरता, Nifty 15,300 च्या खाली तर Sensex 135 अंकांनी कोसळला

Stock Market : आयटी, आरोग्य, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली आहे. 

मुंबई: शेअर बाजारातील घसरणीचे सत्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच राहिलं आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 135   अंकांची घसरण झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 67 अंकांची घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 0.26 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,360 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.44 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,293 वर स्थिरावला. 

आज शेअर बाजार बंद होताना 1082 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2162 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तसेच 95 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

आशियातील प्रमुख शेअर बाजारांत या आठवड्यात घसरण
आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारामध्ये या आठवड्यात 2.1 टक्के तर 6.7 टक्क्यांची घसरण झाल्याचं ब्लूमबर्गने त्यांच्या अहवालात सांगितलं आहे. जकार्ता शेअर बाजारात 2.1 टक्क्यांची घसरण झाली आहे तर हँग सेंगमध्ये 3.4 टक्के, तैवान शेअर बाजारात 5 टक्के तर निक्केई शेअर बाजारात 6.7 टक्क्क्यांची घसरण झाली आहे. 

अमेरिकेतली मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने त्याच्या व्याजदरात वाढ केल्याने त्याचा परिणाम जगभरासह भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Bajaj Finance- 2.57 टक्के
  • Bajaj Finserv- 2.47 टक्के
  • JSW Steel- 1.60  टक्के
  • Coal India- 1.53  टक्के
  • ICICI Bank- 1.23  टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली

  • Titan Company- 6.04  टक्के
  • Wipro- 4.05  टक्के
  • Shree Cements- 3.56  टक्के
  • HDFC Life- 3.46  टक्के
  • BPCL- 3.42  टक्के

अमेरिकेत फेडने व्याजदर वाढवले
अमेरिकेतील महागाईने गेल्या 40 वर्षातील महागाई दराचा तळ गाठला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे फेडरल बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून शेअर बाजार चांगलाच कोसळला. 

परकीय गुंतवणुकदारांकडून गुंतवणूक मागे
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. परकीय गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसांमध्ये 31,000 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यामध्ये 2.2 लाख कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget