Share Market : Sensex 650 तर Nifty 190 अंकांनी वधारला; ऑटो, आयटी, बँकांच्या शेअर्समध्ये वाढ
Stock Market Updates : शेअर मार्केटने पुन्हा एकदा उसळी घेतली असून सेन्सेक्स 60 हजारांच्या पलिकडे गेला आहे तर निफ्टी 18 हजारांवर पोहोचला आहे.
मुंबई : शेअर मार्केटच्या आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली आहे. शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आली असून सेन्सेक्स 650 अंकानी तर निफ्टी 190 अंकानी वधारला आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये एकूण 1.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,395.63 अंकावर बंद झाला. तर निफ्टीमध्येही 1.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,003.30 वर पोहोचला. आज दिवसभरात एकूण 2472 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात वधारल्या तर 948 शेअर्सच्या किंमती कमी अधिक प्रमाणात घसरल्या. तर 88 शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही.
शेअर मार्केट बंद होताना UPL, Hero MotoCorp, Titan Company, Tata Motors आणि Maruti Suzuki च्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Wipro, Nestle, Divis Labs, Asian Paints आणि Power Grid Corp च्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज सार्वजनिक बँका, आयटी, ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा, बँक आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्यांपर्यंत वाढ झाली.
Sensex shoots up 650.98 pts to end at 60,395.63; Nifty climbs 190.60 pts to 18,003.30
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2022
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- UPL- 4.14 टक्के
- Titan Company- 3.30 टक्के
- Hero Motocorp- 3.16 टक्के
- Maruti Suzuki- 2.78 टक्के
- Tata Motors- 2.67 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Wipro- 2.53 टक्के
- Divis Labs- 1.13 टक्के
- Nestle- 0.98 टक्के
- Asian Paints- 0.64 टक्के
- Power Grid Corp- 0.58 टक्के
महत्त्वाच्या बातम्या :