एक्स्प्लोर

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी कायम, Sensex 460 अंकांनी तर Nifty 142 अंकांनी वधारला

Share Market : शेअर बाजारात तेजी कायम असून रिअॅलिटी, बँक, उर्जा आणि मेटल या क्षेत्रातील शेअर्समध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले पतधोरण आज जाहीर केलं. त्या पार्श्वभूमीवर आज शेअर मार्केटमध्ये तेजी कायम असल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 460 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 142 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.79 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,926 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.81 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,605 वर पोहोचला आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. त्यांच्या घोषणेच्या आधीच शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मुंबई शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 344 अंकांनी वधारत 58,810 अंकांवर तर निफ्टी 90 अंकांच्या तेजीने 17554 अंकावर सुरू झाला. 

आज 1491 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1761 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 103 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्राच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे. 

मंगळवारी शेअर बाजारात ONGC, Tata Steel, Infosys, SBI Life Insurance आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Maruti Suzuki, BPCL, Shree Cements, IOC आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • ONGC- 3.14 टक्के
  • Tata Steel- 2.13 टक्के
  • Infosys- 1.86 टक्के
  • HDFC Ban- 1.84 टक्के
  • SBI Life Insurance- 1.83 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Maruti Suzuki- 1.61 टक्के
  • BPCL- 1.58 टक्के
  • IOC- 0.91 टक्के
  • Shree Cements- 0.86 टक्के
  • UltraTechCement- 0.39 टक्के

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे.महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दरता बदल केले जातील असे म्हटले जात होते. रिझर्व्ह बँकेने येत्या आर्थिक वर्षात विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Mall Fire Breakout : पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखलHemant Godse On Nashik Loksabha : माझ्या नावाची लवकरच घोषणा होईल ही अपेक्षा- हेमंत गोडसेGadchiroli Voting Update : गडचिरोली जिल्ह्यातली मतदान प्रक्रिया दुपारी 3 वाजता थांबलीHemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
Do Aur Do Pyaar Review:  वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
Embed widget