(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात घसरण; Sensex 304 अंकांनी तर Nifty 69 अंकानी घसरला
Share Market : ऑटो, बँक, मेटल आणि कॅपिटल गुडस् या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे.
मुंबई: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 304 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 69 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,684 अंकावर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,245 अंकावर पोहोचला आहे.
आज 1424 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1891 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 118 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना हेल्थकेअर, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँक, ऑटो, कॅपिटल गुडस् आणि FMCG सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजार बंद होताना Kotak Mahindra Bank, HDFC, Britannia Industries, Bharti Airtel आणि CiplaL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Hindalco Industries, Divis Labs, Dr Reddy’s Laboratories, Tata Steel आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
Hindalco- 2.53 टक्के
Dr Reddys Labs- 2.41 टक्के
Divis Labs- 2.36 टक्के
Tata Steel- 2.23 टक्के
UPL- 1.66 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
HDFC- 2.35 टक्के
Kotak Mahindra- 2.11 टक्के
Bharti Airtel- 1.99 टक्के
Britannia- 1.78 टक्के
Cipla- 1.76 टक्के
महत्त्वाच्या बातम्या :