search
×

Post Office Banking : पोस्ट ऑफिसच्या IPPB वर सुरू करता येणार बचत खाते, जाणून सोपी पद्धत

IPPB Post Office App : भारतीय पोस्ट ऑफिस बँकेत ऑनलाइन पद्धतीने बँक खाते उघडता येणे शक्य आहे. जाणून घ्या सोपी पद्धत...

FOLLOW US: 
Share:

Post Office Banking :  बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवहारामध्ये मोठे बदल होत आहेत. जवळपास सर्वच बँकेचे व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. पोस्ट खात्याने देखील आपल्या सेवा  ऑनलाइन केल्या आहेत. पोस्ट खात्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB अॅपची सुरुवात केली आहे. या मोबाइल अॅपच्या माध्यमातून सहजपणे डिजीटल बचत खाते सुरू करू शकता. ऑनलाइन व्यवहार देखील करता येऊ शकतात.

या अॅपद्वारे व्यवहार केल्यास पोस्टातील रांगापासून सुटका होईल. सहजपणे घरी बसून व्यवहार करता येतील. IPPB अॅपवर खाते सुरू करणे सोपं आहे. जाणून घ्या त्याची प्रक्रिया...

>> डिजीटल खाते सुरू करण्याचे नियम: 

> डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

> हे खाते उघडल्यानंतर केवायसी प्रक्रिया १२ महिन्यांत पूर्ण करा.

> या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकता.

> हे डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

>> पोस्ट ऑफिस डिजिटल बचत खात्याचे फायदे :

> या बँक खात्याद्वारे तुम्ही नेट बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता.

> याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्याच्या खात्यात पैशांचे व्यवहार सहज करू शकता.

> याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता.

> या खात्याद्वारे पोस्ट ऑफिस आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

>> पोस्ट ऑफिस डिजिटल बचत खाते कसे उघडावे-

> पोस्ट ऑफिस डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी, प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर IPPB अॅप डाउनलोड करा.

> त्यानंतर Open Account या पर्यायावर क्लिक करा.

> त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन क्रमांकाची माहिती विचारली जाईल. भरा.

> आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो तुम्ही नमूद करा.

> त्यानंतर पालकांचे नाव, पत्ता इत्यादी वैयक्तिक तपशील भरा.

> सर्व माहिती दिल्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.

> केवायसी प्रक्रिया एका वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.

> केवायसी प्रक्रियेनंतर, हे खाते पोस्ट ऑफिसच्या नियमित बचत खात्यात रूपांतरित केले जाईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Published at : 23 Mar 2022 03:10 PM (IST) Tags: Banking Indian Post office Online Banking Post Office Bank Digital Banking

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात

Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार