Share Market : शेअर बाजारात पुन्हा घसरण; Sensex 714 अंकांनी तर Nifty 226 अंकांनी घसरला
Stock Market : आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.

मुंबई: सलग दोन सत्रांमध्ये शेअर बाजार वधारल्यानंतर आज पुन्हा एकदा त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 714 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 226 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,197 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.27 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,172 वर पोहोचला आहे.
जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून झाला. शेअर बाजाराची सुरुवात गॅप डाऊनने झाली. अमेरीकी फेडरल बॅंकेच्या प्रमुखांकडून महागाई तातडीनं नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
आज 1447 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1882 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 115 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, रिअॅलिटी, बँक, आयटी, आरोग्य, फार्मा यासह जवळपास सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात Hindalco Industries, SBI, Cipla, IndusInd Bank आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Adani Ports, M&M, Bharti Airtel, ITC आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Adani Ports- 2.78 टक्के
- M&M- 1.06 टक्के
- Bharti Airtel- 0.41 टक्के
- Maruti Suzuki- 0.32 टक्के
- ITC- 0.27 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Hindalco- 4.83 टक्के
- HUL- 3.23 टक्के
- Cipla- 3.16 टक्के
- SBI- 3.04 टक्के
- IndusInd Bank- 2.97 टक्के
महत्त्वाच्या बातम्या:
- 7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नियमांत केले बदल, मुलांना मिळणार 1.25 लाखांपर्यंत पेन्शन
- Reliance Industries Stock Climbs : रिलायन्स इंडस्ट्रीजने गाठला ऐतिहासिक उच्चांक! मार्केट कॅप प्रथमच $247 अब्ज
- 'दंड भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा...' NSEचे माजी प्रमुख रवी नारायण यांना सेबीची नोटीस























