Share Market : गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात तेजी, Sensex 1041 अंकांनी वधारला
Stock Market Updates : बँक, आयटी, मेटल रिअॅलिटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई: शेअर बाजारात आज चांगलीच उसळण पाहायला मिळाली असून त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट झालं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1,041 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 287 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.87 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,857 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,929 अंकांवर पोहोचला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून 0.75 टक्क्यांने व्याज दरवाढ केल्यानंतर शेअर बाजारात तेजी आल्याचं दिसतंय.
आज शेअर बाजार बंद होताना 1865 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1389 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 141 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना Bajaj Finance, Bajaj Finserv, Kotak Mahindra Bank, IndusInd Bank आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर Shree Cements, Bharti Airtel, UltraTech Cement, Cipla आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. बँक, आयटी, मेटल रिअॅलिटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज 15 पैशांनी वधारली असून आज रुपयाची किंमत ही 79.75 इतकी आहे.
शेअर बाजाराची सुरुवात
सकाळी शेअर बाजार सुरू झाला त्यावेळी सेन्सेक्स 451.23 अंकांनी वधारत 56,267 खुला झाला. तर निफ्टी निर्देशांकात 133.05 अंकांनी वधारत 16,774 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 515 अंकांनी वधारला असून 56,331.83 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीत 137 अंकांची तेजी दिसत असून 16,778.95 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Bajaj Finance- 10.63 टक्के
- Bajaj Finserv- 10.03 टक्के
- Kotak Mahindra- 4.24 टक्के
- IndusInd Bank- 3.87 टक्के
- SBI Life Insurance- 3.66 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Shree Cements- 2.89 टक्के
- Bharti Airtel- 1.19 टक्के
- UltraTechCement- 0.98 टक्के
- Cipla- 0.68 टक्के
- Bajaj Auto- 0.66 टक्के
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
