Share Market : आठवड्याची सुरुवात सकारात्मक, Nifty 16,278 अंकांवर तर Sensex 760 अंकांनी वधारला
Stock Market Updates: बीएसई मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची वाढ झाली असून आयटी, सार्वजनिक बँका, मेटल, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, रिअॅलिटी या कंपन्यांचे शेअर्स 1-3 टक्क्यांनी वाढले.

मुंबई: आठवड्याचा पहिलाच दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक ठरला आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 760 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 229 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 1.41 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,521 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.43 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,278 अंकांवर पोहोचला. गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये पडझड होत असल्याचं दिसून आलं होतं. आता या आठवड्याची सुरुवात चांगली झाल्याचं दिसून आलं.
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 2296 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1077 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. एकूण 158 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
Hindalco Industries, IndusInd Bank, Infosys, Bajaj Finserv आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Britannia Industries, Dr Reddy’s Laboratories, HDFC Bank, M&M आणि Maruti Suzuk या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.
आज जवळपास सर्वच क्षेत्रांतील शेअर्समध्ये वाढ झाली. आयटी, सार्वजनिक बँका, मेटल, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, रिअॅलिटी या कंपन्यांचे शेअर्स 1-3 टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची वाढ झाली
रुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून आजही रुपया घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 79.97 इतकी आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Hindalco- 4.72 टक्के
- IndusInd Bank- 4.42 टक्के
- Infosys- 4.16 टक्के
- Tech Mahindra- 3.51 टक्के
- Bajaj Finserv-3.46 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Britannia- 1.92 टक्के
- Dr Reddys Labs- 1.76 टक्के
- HDFC Bank- 1.06 टक्के
- Maruti - 0.83 टक्के
- Nestle- 0.78 टक्के






















