Share Market : बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी, Sensex 800 अंकांनी वधारला, Nifty देखील 17,300 च्या वर
Share Market: ऑटो, फार्मा, आयटी, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस आणि रिअॅलिटी सेक्टरमध्ये आज काहीशी तेजी दिसून आली आहे.
Share Market: मंगळवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज चांगलीच तेजी दिसून आली. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 813 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 237 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.42 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,014 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.39 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,339 वर पोहोचला आहे.
आज 1773 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1632 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 142 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, फार्मा, आयटी, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 ते 1.17 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारातTech Mahindra, Tata Motors, Wipro, BPCL आणि Bajaj Finserv या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून IndusInd Bank, Kotak Mahindra Bank, UPL, Coal India आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Tech Mahindra- 4.85 टक्के
- Tata Motors- 4.11 टक्के
- BPCL- 3.80 टक्के
- Wipro- 3.70 टक्के
- Bajaj Finserv- 3.23 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- IndusInd Bank- 3.48 टक्के
- Kotak Mahindra- 2.16 टक्के
- UPL- 1.74 टक्के
- Coal India- 1.14 टक्के
- HUL- 0.43 टक्के
संसदेत आज मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजार सुरू होताना त्यामध्ये चांगलीच वाढ झाली होती. सेन्सेक्स 1000 अंकांच्या वर गेला होता. आर्थिक सर्वेक्षणात वाढीच्या उच्च अंदाजामुळे बाजार पॉझिटिव्ह दिसत आहे. याचे कारण उच्च वाढीमुळे मागणी वाढेल, ज्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या कामगिरीवर होईल.
लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2021-22 साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. यामध्ये येत्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या 8 ते 8.5 टक्क्यांनी विकास करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच या सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाचा जीडीपी 9.2 टक्के असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवालात 11 टक्के जीडीपी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Economic Survey : आर्थिक सर्वेक्षणात महागाईबाबत चिंता व्यक्त; आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार कितपत तयार?
- Economic Survey 2022: कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये 3.6 टक्क्यांची वाढ
- Economic Survey 2022 : पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 8-8.5 टक्के राहणार, पण...