Share Market : शेअर मार्केटमधील तेजी कायम; Sensex 533 अंकांनी तर Nifty 156 अंकांनी वधारला, 'या' कंपन्यांना झाला फायदा
Share Market : ऑटो, मेटल, उर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्सच्या किंमतीत आज वाढ झाली आहे तर आयटी आणि फार्माचे शेअर्स काहीसे घसरले.
मुंबई : शेअर मार्केटमध्ये बुधवारी तेजी कायम दिसून आली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 533.15 अंकांनी तर निफ्टी 156.50 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.88 टक्क्यांनी वाढ होऊन तो 61,150.04 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.87 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,212.30 वर पोहोचला आहे. आज 1694 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1554 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 54 शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आजच्या दिवशी मेटल, ऑटो, रिअॅलिटी, ऑईल अॅन्ड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर आयटी आणि फार्मा सेक्टरच्या शेअर्समध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आले आहे.
आज मार्केट बंद होताना M&M, Bharti Airtel, Reliance Industries, IndusInd Bank आणि ONGC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली तर Titan Company,TCS, Shree Cements, Britannia Industries आणि Cipla कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. जागतिक शेअर बाजारातील भक्कम वातावरणामुळे आज शेअर मार्केटमध्ये खरेदीचा जोर राहिला आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- M&M- 4.65 टक्के
- Bharti Airte- 3.80 टक्के
- Reliance- 2.67 टक्के
- IndusInd Bank- 2.57 टक्के
- ONGC- 2.49 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Titan Company- 1.52 टक्के
- TCS- 1.43 टक्के
- Shree Cements- 1.19 टक्के
- Britannia- 1.15 टक्के
- Cipla- 1.06 टक्के
टीसीएस (TCS), विप्रो (Wipro) आणि इन्फोसिस (Infosys) या तिन्ही आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचा आर्थिक अहवाल आज येणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असल्यानं त्यांच्या तिमाही अहवालावर संपूर्ण शेअर बाजाराचं लक्ष होतं. त्याचा परिणाम आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर काही प्रमाणात झाल्याचं दिसून आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :