एक्स्प्लोर

सोनं होतंय स्वस्त महाग? मग 'असा' लावा भारी दिमाग; 5 पद्धतीने करा गुंतवणूक, भविष्यात मिळेल बक्कळ पैसा!

कमी जोखीम पत्करून चांगला परतावा मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. सोने या धातूत गुंतवणूक करूनही चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.

मुंबई : गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंमध्ये चांगलाच चढउतार पाहायला मिळतोय. मात्र गेले सहा महिने किंवा वर्षभराचा विचार केल्यास तुम्हाला सोन्याच्या भावात एकंदरीत वाढ झाल्याचंच दिसेल. त्यामुळेच सोनं हा असा धातू आहे, ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात हमखास चांगले पैसे मिळू शकतात, असा दावा केला जातो. मात्र सोन्याच्या दरातील सध्याचा चढउतार पाहून अनेकांना यात गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न पडेल. मात्र तुम्ही सोन्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात चांगले रिटर्न्स मिळवू शकाल. 

सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय कोणत आहेत? 

सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. तुम्हाला एकूण पाच पद्धतीने सोनं खरेदी करता येतं. यातील सर्वश्रूत असलेला पर्याय म्हणजे थेट सोन्याचा धातू खरेदी करणे. काहीजण सोन्याचं बिस्किट, नाणे, दागिने अशा वेगवेगळ्या मार्गाने सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र तुम्ही गोल्ड इटीएफच्या माध्यमातूनही सोन्यात गुंतवणूक करू शकता. 

सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्येही करता येते गुंतवणूक

म्युच्यूअल फंडामध्येही सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. सध्या अनेक गोल्ड म्युच्यूअल फंड्स अपलब्ध आहेत. त्यात तुम्ही तुमच्या सोईनुसार गुंतवणूक करू शकता. केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात येणाऱ्या सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशावर व्याज मिळते तसेच तुम्हाला भविष्यात त्यावेळच्या सोन्याच्या दरानुसार पैसे मिळतात.   

डिजिटल गोल्ड पर्यायही उपलब्ध

तुम्ही डिजिटल गोल्डच्या माध्यमातूनही सोन्यात पैसे गुंतवू शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अगदी एका रुपयापासून सोन्यात गुंतवणूक करता येते. अनेक फिनटेक प्लॅटफॉर्म्स तुम्हाला तशी सोय उपलब्ध करून देतात. तुम्हाला तुम्ही केलेली गुंतवणूक त्यावेळच्या सोन्याच्या भावानुसार विकूही शकता. विशेष म्हणजे डिजिटल गोल्डच्या माध्यमातून तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्ही फिजिकल सोनंदेखील खरेदी करू शकता.

आधी योग्य अभ्यास करणे गरजेचे

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वर उल्लेख केलेले वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले तरी यातील काही पर्याय हे शेअर मार्केटशी संबंधित असतात. त्यामुळे सोन्याचा भाव हा कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करताना अगोदर योग्य तो अभ्यास करणे गरजेचे आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)   

हेही वाचा :

बाळाचा जन्म होताच करा फक्त 'हे' एक महत्त्वाचं कामं, 18 वर्षांचं होताच, मूल होईल करोडपती!

बापरे बाप...मुंबईतल्या वरळीत एका घराची किंमत तब्बल 105 कोटी, सुविधा वाचून व्हाल थक्क!

PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget