एक्स्प्लोर

चीनच्या DeepSeek मुळे शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, एका कंपनीचे 600 अब्ज डॉलर बुडले; भारतातही कोट्यवधी पाण्यात!

DeepSeek Share Market Crash : डीपसीक या कंपनीने आणलेल्या चॅट बॉटमुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. एका कंपनीचे मूल्य तर तर कोट्यवधी डॉलर्सने कमी झाले आहे.

Share Market Crash Due To Deepseek : चीनच्या डीपसीक या कंपनीने ओपन एआय चॅटबॉट आणले आहे. या चॅटबॉटमुळे अमेरिकेसह जगभरात खळबळ माजली आहे. डीपसीकने हा चॅटबॉट अगदी कमी खर्चात तयार केल्यान एआय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांनी तोंडात बोटे घातली आहेत. विशेष म्हणजे या चॅटबॉटमुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्येही हाहा:कार उडाला आहे. अनके टेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. 

कमी पैशांत उभं केलं चॅट बॉट

 ओपन एआय यासारख्या कंपन्या चॅट जीपीटीसारखे चॅट बॉट तयार करण्यासाठी अब्जो डॉलर्सचा खर्च करत आहे. मात्र तुलनेने डीपसीकने विकसित केलेले हे चॅटबॉट फारच कमी पैशांत उभे केलेले आहे. त्यामुळेच टेक कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. भारतातही त्याचा परिणाम झाला आहे. अमेरिकन टेक कंपनी NVIDIA चे शेअर्स तर साधारण 20 टक्क्यांनी घसरले असून या कंपनीला तब्बल 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 

तब्बल 50 टक्क्यांनी शेअर्स खाली आले

डीपसीकच्या DeepSeek R1 या चॅटबॉटमुळे भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या काही टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या दोन ते तीन सत्रांत साधारण 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. म्हणजेच काही कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य हे साधारण 50 टक्यांपर्यंत खाली आले आहे. शेअर्समध्ये घसरण झालेल्या कंपन्यांत अनंत राज, नेटवेब टेक्‍नॉलॉजीज इंडिया (NetWeb share) तसेच झेन टेक्‍नॉलॉजीज (Zen Technologies Stock) यांच्यासह इतरही काही कंपन्यांचा समावेश आहे.

DeepSeek मुळे बाजारात नेमकं काय घडलं?

DeepSeek  या चीनच्या एआय स्टार्टअपमुळे NVIDIA या कंपनीच्या शेअरमध्य मोठी घसरण झाली आहे. ही कंपनी एआय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना चीप पुरवते. मात्र अत्यंत कमी खर्चात DeepSeek ने चॅटबॉट तयार केल्यामुळे एआय जगात एवढा मोठा खर्च करणे गरजेचे आहे का? असा विचार सगळीकडे चालू झाला आहे. सोबतच डीपसीक हे चॅटबॉट चॅट जीपीटीला पर्याय आहे, असा दावा डीपसी कंपनीकडून केला जात आहे. त्यामुळेच गुंतवणूकार धास्तावले आहेत. परिणामी NVIDIA कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भारतातीलही काही टेक कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कमी झाले आहे.    

कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये किती घसरण? 

भारतात अनंत राज लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. या कंपनीला लोअर सर्किट लागले असून सध्याचे एका शेअरचे मूल्य 534.45  रुपये आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर 17 टक्क्यांनी घसरून 668.05  रुपयांपर्यंत खाली आले होते. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्यदेखील 10 टक्क्यांनी कमी होऊन 1,460.35  रुपयांवर बंद झाले. सोमवारीदेखील या कंपनीचा शेअर 11 टक्क्यांनी घसरून 1,622.60  रुपयांपर्यंत खाली आला होता. Zen Technologies या कंपनीचा शेअरही मंगळवारी 14 टक्क्यांनी कमी होऊन  1,495.10  रुपयांपर्यंत घसरला. सोमवारी हाच शेअर  1,743.35 रुपयांवर होता.  

हेही वाचा :

चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी चीननं आणलं DeepSeek, अमेरिकेची झोप उडाली, AI जगात होणार मोठा बदल!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget