(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर देशात 8 हजार कोटींच्या वस्तूंची विक्री, 'या' वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार दिवसांत छठपूजेच्या दिवशी देशभरात 8 हजारांहून अधिक वस्तूंची विक्री झाली आहे.
Chhath pooja : सध्या देशात सणांचा हंगाम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूंची विक्री होत आहे. दिवाळीनंतर आता छठ पुजेचा हंगाम सुरु आहे. या काळात वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार दिवसांत छठ पूजेच्या दिवशी देशभरात 8 हजारांहून अधिक वस्तूंची विक्री झाली आहे. या काळात कपडे, फळे, फुले, भाजीपाला, साड्या आणि मातीच्या चुलीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
17 नोव्हेंबरपासून छठ पुजा सुरु झाली आहे. उद्या म्हणजे 20 नोव्हेंबरपर्यंत ही छठ पुजेचा उत्साह चालणार आहे. चार दिवसांचा छठ पुजेचा उत्सव असतो. दरम्यान बिहार आणि झारखंड व्यतिरिक्त इतर राज्यात स्थायिक झालेल्या बिहारमधील लोकांनी विविध अंदाजानुसार छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. राज्यांच्या किरकोळ बाजारातून 8 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली.
एका अहवालानुसार, देशभरात 20 कोटींहून अधिक लोक छठ पूजा साजरी करत आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यावर्षी प्रत्येक सणाच्या विक्रीचे आकडे जाहीर करत आहे. छठ पूजेच्या काळात विविध वस्तुंच्या विक्रीचे आकडे देखील जाहीर केले आहेत. छठ पूजा हा भारतातील लोकसंस्कृतीचा सर्वात मोठा सण मानला जातो. जो खूप लोकप्रिय आहे.
या गोष्टींची मोठ्या प्रमाणात विक्री
छठ पूजेसाठी फळे, फुले आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. तर कपडे, साड्या, मेकअपचे सामान, अन्नधान्य, मैदा, तांदूळ, डाळी आणि इतर खाद्यपदार्थ, सिंदूर, सुपारी, लहान वेलची विक्री मोठ्या प्रमाणात होते. पूजेचे साहित्य, नारळ, आंब्याचे लाकूड, मातीची चूल, देशी तूप आणि इतर वस्तूंची प्रचंड विक्री होते. स्त्रिया आपल्या मुलांचे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी छठ पूजा उपवास करतात. या पूजेमध्ये पतीसाठी लांब सिंदूर अतिशय शुभ मानला जातो आणि त्यामुळे छठपूजेच्या वेळी महिला नाकापासून कपाळापर्यंत सिंदूर लावतात. असे मानले जाते की स्त्रीने सिंदूर जितका जास्त काळ लावला तितके तिच्या पतीचे आयुष्य जास्त असते. छठ पूजेनंतर सणांचा उत्साह 23 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तेव्हा देशभरात तुळशी विवाह मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याच दिवसापासून देशात लग्नाचा हंगाम देखील सुरु होईल.