एक्स्प्लोर

New Rule: आता 'या' कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल

Government Changed Rule: सरकारने नियमांत बदल केल्याने आता काही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ मिळणार नाही.

Government Rule Changed: केंद्र सरकारने आता काही कर्मचाऱ्यांसाठी नियम (Rules) बदलले आहेत. या नियमानुसार कर्मचाऱ्यांना आता पीएफ (PF), ग्रॅच्युइटी (Gratuity) आणि पेन्शनचे (Pension) फायदे मिळणार नाहीत. नियम 13 मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे. सरकारने यात म्हटल्याप्रमाणे, हे सदस्य यापुढे पेन्शन (Pension) आणि पीएफसाठी (भविष्य निर्वाह निधी) पात्र मानले जाणार नाहीत, कारण ते सरकारकडून एकाच वेळी दोन सेवा घेऊ शकत नाहीत.

नक्की कोणत्या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार लाभ?

केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार, आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) आणि वस्तू आणि सेवा कर (GST) न्यायाधिकरणाच्या सदस्यांना यापुढे ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचे लाभ दिले जाणार नाहीत. याव्यतिरिक्त, न्यायाधिकरण सदस्यत्व हे पूर्ण-वेळ नोकरीच्या (Full Time Job) श्रेणीमध्ये ठेवलं जाईल, याचा अर्थ त्यांना कोणत्या तरी एका सेवेचा राजीनामा द्यावा लागेल.

लाभ न मिळण्याचं कारण काय?

यापूर्वी, उच्च न्यायालय (High Court) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सेवारत न्यायाधीशांना त्यांच्या विद्यमान सेवेत असताना काही वेळा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्त केलं जायचं, त्यामुळे ते निवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळवण्यास देखील पात्र होते. परंतु आता कोणत्याही न्यायालयाच्या सेवारत न्यायाधीशाची न्यायाधिकरणाचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती झाली, तर न्यायाधिकरणात रुजू होण्यापूर्वी आधीच्या पदाचा एकतर राजीनामा द्यावा लागेल किंवा मूळ सेवेतून स्वेच्छेने सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. हे लोक एकाच वेळी दोन्हीकडे मिळणाऱ्या सेवांचा फायदा घेऊ शकत नाहीत.

वकिलांनाही आलं होतं लाभांपासून वगळण्यात

केंद्र सरकार हे प्रलंबित कर प्रकरणं आणि खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी GST अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे नेमका अशा वेळीच हा बदल करण्यात आल्याचं  सुधारित न्यायाधिकरणाच्या नियमांमध्ये म्हटलं गेलं आहे. यापूर्वी सरकारने वकिलांनाही न्यायिक सदस्य होण्यापासून वगळलं होतं.

सलग 5 वर्ष काम न करताही मिळते ग्रॅच्युएटी

ग्रॅच्युइटी कायद्याच्या (Gratuity Act) कलम-2A मध्ये 'सलग काम करणं' अशी याची स्पष्ट व्याख्या केली आहे. त्यानुसार, पाच वर्ष काम न केल्यानं अनेक कर्मचारी ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2 अ नुसार, कर्मचार्‍यांनी त्यांच्या एम्प्लॉयरसोबत चार वर्ष सलग 190 दिवस काम केलं, तर ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात.

हेही वाचा:

Layoffs in Alphabet : Google ची मूळ कंपनी Alphabet ने पुन्हा कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं; नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget