3 महिन्यात 9800 कोटींची कंपनी, 27 व्या वर्षीच अब्जाधीश, कोण आहे भारताचा 'हा' तरुण उद्योगपती?
भारतात (India) दरवर्षीच अब्जाधीशांची (billionaire) संख्या वाढत आहे. असाच एक देशातील अब्जाधीश सध्या चर्चेत आहे. देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
Pearl Kapoor : भारतात (India) दरवर्षीच अब्जाधीशांची (billionaire) संख्या वाढत आहे. असाच एक देशातील अब्जाधीश सध्या चर्चेत आहे. देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. ज्याने अगदी लहान वयात अब्जावधी डॉलर्सची कंपनी स्थापन केली आहे. तरुण उद्योगपती पर्ल कपूर (Pearl Kapoor) असे या उद्योगपतीचं नाव आहे. त्याने अवघ्या तीन महिन्यांत त्याच्या कंपनीचे मूल्य 1.1 बिलियन (सुमारे 9,129 कोटी रुपये) झाले आहे.
Zyber 365 असं कंपनीचं नाव
पर्ल कपूर फक्त 27 वर्षांचा आहे. त्याच्या कंपनीचे नाव Zyber 365 आहे, जी त्यांनी गेल्या वर्षी 2023 मध्ये स्थापन केली होती. ही एक भारतीय कंपनी आहे. ही कंपनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षित एआय इकोसिस्टममध्ये माहिर आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय युनायटेड किंगडममध्ये आहे. या कंपनीचा व्यवसाय भारतातील अहमदाबाद, गुजरात येथून चालतो.
अवघ्या तीन महिन्यांत 9840 कोटींची कंपनी स्थापन
अब्जाधीश पर्ल कपूर याने झपाट्याने आपली कंपनी वाढवली आहे. या कंपनीने अवघ्या 3 महिन्यांत 1.2 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 9,840 कोटी रुपयेचे मूल्यांकन गाठले आहे. ही कंपनी भारत आणि आशियातील सर्वात वेगाने वाढणारी युनिकॉर्न म्हणून उदयास आली असल्याचा दावाही केला जात आहे. कपूर यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,129 कोटी रुपये) आहे. कंपनीमध्ये त्यांची 90 टक्के हिस्सेदारी आहे.
कंपनीला मोठा निधी मिळाला
कंपनीच्या वाढत्या विकासाचा आणि भविष्याचा विचार करून Sram & Mram ग्रुपने मालिका A निधीमध्ये 100 दशलक्ष डॉलरची महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. ज्यामुळं Zyber 365 चे मूल्यांकन आणखी वाढले. Jaiber 365 चे EVM हे एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्म आहे जे सुरक्षितता, ऊर्जा आणि टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करते. पर्ल कपूर यांनी प्रथम लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली. इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये एमएससी केले. पर्लला आधीच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. अशा परिस्थितीत त्यांनी AI ची वाढती क्रेझ पाहिली आणि मे 2023 मध्ये त्यांचा उद्योजकीय प्रवास सुरू केला. Jaiber 365 ची स्थापना केली. त्यापूर्वी, कपूर यांनी एएमपीएम स्टोअरमध्ये आर्थिक सल्लागार आणि अँटियर सोल्यूशन्समध्ये व्यवसाय सल्लागार म्हणून काम केले. ही कंपनी सुरु करण्यापूर्वी त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये बिलियन पे टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी उघडली होती.
महत्वाच्या बातम्या:
Anand Mahindra : 'मी जगात कधीच श्रीमंत होणार नाही' उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर