(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवलेले पैसे दुप्पट किंवा तिपप्ट कधी होणार? जाणून घ्या सोप्या भाषेत
एखाद्या योजनेत तुम्ही गुंतवलेले (investment) पैसे दुप्पट किंवा तिप्पट कध होणार? हे तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
Business News : एखाद्या योजनेत तुम्ही गुंतवलेले (investment) पैसे दुप्पट किंवा तिप्पट कध होणार? हे तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल किंवा कोणत्या योजनेत गुंतवणूक करुन तुम्हाला जास्त नफा मिळेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. प्रत्येकाला आपले पैसे कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवायचे असतात. यातून त्यांना लवकरात लवकर पैसे दुप्पट करायचे असतात. काही लोकांना तिप्पट रक्कमही करायची असते. यासाठी ते गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधतात. तर काही लोक कोणताही त्रास होऊ नये म्हणून एफडीमध्ये (FD) गुंतवणूक करतात. पण जेव्हा ते गुंतवणूक करतात तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न राहतो की त्यांचे पैसे दुप्पट-तिप्पट कधी होणार. आज आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती सांगणार आहोत. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही या मार्गाने शोधू शकता की तुम्ही गुंतवलेले पैसे कधी दुप्पट होऊ शकतात.
पैसे दुप्पट करण्यासाठी 'हे'काम करा
तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी किती दिवस लागतील याची गणना करण्यासाठी, एक सूत्र लागू केले जाते. ज्याला नियम 72 म्हणतात. याद्वारे, तुम्ही गुंतवलेले पैसे दुप्पट कधी होणार आहेत हे एका मिनिटापेक्षा कमी वेळात तुम्ही शोधू शकता. हे खरं तर गणितीय समीकरणांवर आधारित तंत्र आहे. या नियमानुसार, व्याजदराला 72 ने भागून मिळालेला परिणाम, एखाद्या व्यक्तीची गुंतवणूक समान वर्षांमध्ये दुप्पट होऊ शकते. हे सहसा एफडी इत्यादीसारख्या गुंतवणुकीसाठी चांगले कार्य करते. हे कोणत्याही योजनेच्या निश्चित परताव्याच्या दरावर लागू केले जाऊ शकते. समजा तुम्हाला FD वर 8 टक्के व्याज मिळत असेल, तर तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी 9 वर्षे लागतील. म्हणजेच तुमची एक लाख रुपयांची गुंतवणूक 9 वर्षांत 8 टक्के दराने दुप्पट होईल.
तुमचे पैसे तिप्पट झाले हे कसं कळणार?
तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी किती दिवस लागतील हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, म्हणजे एका लाखाला तीन लाख व्हायला किती वेळ लागेल. त्यामुळं तुम्हाला दुसरा फॉर्म्युला लागू करावा लागेल. त्यासाठी नियम 114 आहे. ते लागू करण्याची पद्धत 72 चा नियम आहे. यामध्ये देखील व्याजदराला 114 ने भागले आहे. म्हणजेच कोणत्याही गुंतवणुकीवर वार्षिक 8 टक्के व्याज मिळत असेल. सूत्रानुसार 114/8=14.25 म्हणजेच पैसे तिप्पट होण्यासाठी सुमारे 14 वर्षे आणि 2 महिने लागतील.
महत्त्वाच्या बातम्या:
'या' योजनेत दररोज 100 रुपये जमा करा, 5 वर्षांत 'एवढे' लाख रुपये मिळावा