एक्स्प्लोर

शिक्षण झालंय पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा, 'हा' व्यवसाय सुरु करा 

तुम्हाला फक्त 5000 रुपयांच्या गुंतवणुकीत (Invetsment) एक व्यवसाय सुरु करता येतो. यामधून तुम्हाला चांगला नफा देखील मिळवता येतो. जाणून घेऊयात सविस्तर माहिती एका क्लिकवर.

PM Jan Aushadhi Kendra: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच लगेच नोकरी लागेल असे नसते. शिक्षण झाल्यानंतर नोकरी (Job) शोधण्यात काही काळ जातो. तर अनेक तरुणांना शिक्षणानंतर नेमकं काय करावं? कोणत्या उद्योग व्यवसाय करावा? असा प्रश्न पडतो. तर अशा तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्हाला फक्त 5000 रुपयांच्या गुंतवणुकीत (Invetsment) एक व्यवसाय सुरु करता येतो. यामधून तुम्हाला चांगला नफा देखील मिळवता येतो. जाणून घेऊयात सविस्तर माहिती एका क्लिकवर.

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र (PM Jan Aushadhi Kendra) सुरु करुन तुम्ही एका चांगल्या व्यवसायाला सुरुवात करु शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला केंद्र सरकार देखील मदत करते. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला 5,000 रुपयांचा खर्च करावा लागेल. ही केंद्रे उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी. फार्मा किंवा बी. फार्माचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचा व्यवसाय हा तुमच्या बजेटमध्ये बसणारा व्यवसाय आहे. तुमच्यासाठी हा व्यवसाय फायदेशीर आहे. केंद्र सरकार हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत देते. याद्वारे तुमचे उत्पन्न अगदी कमी गुंतवणुकीने सुरु होते. सध्या देशात प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राची संख्या सातत्याने वाढत आहे. तुमच्यासाठी ही कमाईची एक उत्तम संधी ठरु शकते. या केंद्रांद्वारे लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

देशात 10,000 हून अधिक प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशात 10,000 हून अधिक प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यांची संख्या आणखी वाढवण्यावर सरकार भर देत आहे. या औषध केंद्रांमध्ये 1800 प्रकारची औषधे आणि 285 वैद्यकीय उपकरणे ठेवण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जनऔषधी केंद्रांवर 50 ते 90 टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे.

 अर्ज करण्यासाठी 5000 रुपयांचा खर्च करावा लागणार 

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयांचा खर्च करावा लागेल. केंद्रे उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी. फार्मा किंवा बी. फार्माचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी पुरेशी जागा असावी, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट निश्चित करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान, विशेष श्रेणी आणि विशेष क्षेत्राशी संबंधित अर्जदारांसाठी शुल्कात सूट देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडल्यानंतर सरकारकडून प्रोत्साहन रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. 5 लाख रुपये किंवा कमाल 15,000 रुपयांपर्यंतच्या औषधांच्या मासिक खरेदीवर 15 टक्के प्रोत्साहन देण्याचा नियम केंद्रात करण्यात आला आहे. 

व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड 
फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र 
पॅन कार्ड
वैध मोबाइल क्रमांक
निवास प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. अधिकृत वेबसाइट janaushadhi.gov.in वर जा. होम पेजवरील मेनूमधील Apply For Kendra या पर्यायावर क्लिक करा. नवीन पानावर Click Here To Apply पर्यायावर क्लिक करा. आता साइन इन फॉर्म उघडेल, ज्याच्या खाली Register now पर्याय निवडा. त्यानंतर नोंदणी फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल, त्यात आवश्यक माहिती भरा. यानंतर, ड्रॉप बॉक्समध्ये राज्य निवडा आणि आयडी-पासवर्ड विभागात पुष्टी केलेला पासवर्ड प्रविष्ट करा. आता तुम्हाला नियम आणि अटींवर टिक करा आणि नंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. फक्त या चरणांचे अनुसरण करून, PM जन औषधी केंद्रासाठी तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

हम किसीसे कम नही! काळ्या मातीत पिकवलं 'पिवळं सोनं', वर्षभरात लाखोंचा नफा, वाचा जिद्दी महिलेची यशोगाथा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget