(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं? सविस्तर माहिती एका क्लिकवर
मोदी सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, मजूर, गरीब आणि तरुणांच्या मदतीसा नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सामान्यांना नेमकं काय मिळालं? पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काल संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, मजूर, गरीब आणि तरुणांच्या मदतीसा नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सामान्यांना नेमकं काय मिळालं? पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.
सरकारने पायाभूत सुविधांच्या खर्चात 11 टक्के वाढ करण्याची योजना आखली आहे. यासोबतच वित्तीय तूटही नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे. यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारासोबतच आरोग्य आणि शिक्षणावरही भर देण्यात आला आहे. वाढत्या कर संकलनामुळं सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. पुढील आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तूट 5.1 टक्के पर्यंत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मार्चमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजापेक्षा हे 5.8 टक्के कमी आहे. अंतरिम अर्थसंकल्पात सीतारामन यांनी भांडवली खर्चासाठी 11.1 लाख कोटी रुपयांचे बजेट दिले आहे.
अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळाले?
मध्यमवर्गीयांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मध्यमवर्गीयांना स्वतःचे घर खरेदी किंवा बांधता यावे यासाठी सरकार हाउसिंग फॉर मिडिल क्लास’योजना सुरू करणार आहे. याद्वारे मध्यमवर्गीयांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची व्याप्ती वाढणार
या योजनेअंतर्गत सरकार 3 कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहे. पुढील पाच वर्षांसाठी 2 कोटी घरांचे अतिरिक्त उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अंगणवाडीला चालना
‘सक्षम अंगणवाडी’ आणि ‘पोशन 2.0’ कार्यक्रमांना गती देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याद्वारे कुपोषण, बालपणीची काळजी आणि विकासाला चालना दिली जाणार आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणावर मोठी योजना
9 ते14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणास प्रोत्साहन दिले जाईल.
आयुष्मान भारताचा विस्तार
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व आशा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांचा समावेश करण्यासाठी आरोग्य कव्हरेज वाढवण्यात येईल.
थकित कर मागणीवर दिलासा
सरकारनं थकित कर मागणीबाबत मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत, 2010 या आर्थिक वर्षासाठी 25,000 रुपयांपर्यंत आणि 2011 ते 2015 या आर्थिक वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतची वादग्रस्त थकबाकी कर मागणी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 1 कोटी करदात्यांना याचा फायदा होणार आहे.
मोफत विजेसाठी मोठी योजना
सरकार 1 कोटी घरांना त्यांच्या छतावर सौर रूफटॉप पॅनेल बसविण्यास सक्षम करेल. याद्वारे दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उडान योजनेंतर्गत विमानतळांचे जाळे वाढणार
सरकार उडान योजनेंतर्गत सध्याच्या विमानतळांचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत नवीन विमानतळांचा सर्वसमावेशक विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.
PM गति शक्तीवर लक्ष केंद्रित केले जाणार
केंद्र सरकार लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी PM गति शक्ती अंतर्गत तीन प्रमुख रेल्वे कॉरिडॉर कार्यक्रम राबवणार आहे.
महत्वाच्या बातम्या: