Budget 2023 Tax Slab : कर रचनेने मध्यमवर्गाचा खेला होबे! केवळ एका रुपयाच्या उत्पन्नामुळे 25 हजारांचा फटका
Budget 2023 Tax Slab : अर्थसंकल्पातील घोषणेनंतर नव्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्यांना एक रुपयांमुळे 25 हजाराचा फटका बसू शकतो.
Budget 2023 Tax Slab : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Niramla Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करताना कर रचनेबाबत केलेल्या घोषणेनंतर करदात्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. जवळपास आठ वर्षानंतर प्राप्तिकराबाबत (Tax Slab) मोठी घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) सात लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याची घोषणा केली. त्याचे स्वागतही करण्यात आले. मात्र, सात लाखांपेक्षा एक रुपयादेखील अधिक असेल तरी मध्यमवर्गाला मोठा धक्का बसणार आहे.
एक रुपयाच्या उत्पन्नामुळे मोठा फटका
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्राप्तिकराच्या सवलतीवरून करदात्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कर रचनेवरून काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागल्या आहेत. जर, तुमचे उत्पन्न 7 लाखांहून एक रुपयादेखील असल्यास तुम्हाला 25 हजार पर्यंत कर भरावा लागू शकतो. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या कर प्रणालीत सेक्शन 87 ए चा फायदा दिला आहे. स
नव्या कर प्रणालीनुसार, जर तुमचे उत्पन्न 7 लाख रुपये असल्यास तुम्हाला एक पैसाही कर भरावा लागणार नाही. जर, तुमचा पगार, उत्पन्न सात लाखाहून अधिक असल्यास तुम्हाला 3,00,001 ते सहा लाख रुपयापर्यंतचा 5 टक्क्यांचा कर लागू होईल. 6,00,001 ते 9 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागू शकतो. जर, तुमचा पगार सात लाखांपेक्षा एक रुपयांहून अधिक असल्यास तुम्हाला 87 ए चा लाभ मिळणार नाही.
एक रुपयाचा 'भुर्दंड'
जर एखाद्याचा पगार 7 लाख 1 रुपये असेल तर त्याला 25000 रुपयांचा टॅक्सचा शॉक लागेल. नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपैकी 3 लाख रुपयांवर कोणताही कर लागणार नाही. उर्वरित चार लाखांवर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार आयकर भरावा लागेल. पहिल्या 3 लाख रुपयांच्या पगारावर तुम्हाला 5 टक्के कर भरावा लागेल. याचाच अर्थ 15000 रुपये आणि उर्वरित 1 लाख रुपयांवर तुम्हाला 10 टक्के दराने 10000 रुपये कर भरावा लागेल. म्हणजेच 700001 रुपये पगारावर तुम्हाला 25000 रुपये (15000+10000) आयकर भरावा लागेल.
ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पंकज मठपाल यांनी सांगितले की, जुन्या कर प्रणालीमध्ये, प्राप्तिकर भरणाऱ्याला देणगी देऊन प्राप्तिकर सवलतीचा दावा करता येत होता. नवीन कर प्रणालीमध्ये ही सुविधा नाही. कर आणि गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर स्लॅब सुलभ करून आणि कलम 87A फायदे वाढवून नवीन कर व्यवस्था अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, लाभ एकसमान नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.