एक्स्प्लोर

GST Collection : जुलै महिन्यातील जीएसटी कलेक्शन 1.16 कोटींवर; 33 टक्क्यांनी वाढ

आकडेवारीनुसार, जुलै, 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,16,393 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी 22,197 कोटी रुपये, राज्य जीएसटी 28,541 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 57,864 कोटी आहे.

नवी दिल्ली : जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन 33 टक्क्यांनी वाढून 1.16 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. जुलैमधील जीएसटी महसूल आकडेवारुन लक्षात येते की कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजे जून, 2021 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे 92,849 कोटी रुपये होते.

जीएसटी महसूल 1,16,393 कोटी रुपये

आकडेवारीनुसार, जुलै, 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,16,393 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी 22,197 कोटी रुपये, राज्य जीएसटी 28,541 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 57,864 कोटी रुपये (त्यापैकी 27,900 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर जमा झाले) आणि उपकर 7,790 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर 815 कोटी रुपये जमा झाले. ).

जुलै, 2021 मध्ये जीएसटी संकलनाचा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 33 टक्के अधिक आहे. यामध्ये 1 ते 31 जुलै पर्यंत भरलेले जीएसटी रिटर्न, त्याच कालावधीसाठी आयजीएसटी आणि मालाच्या आयातीवर जमा केलेला सेस यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात जुलै 2020 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 12,508 कोटी रुपये इतके होते, तर जुलै 2021 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 18,899 कोटी रुपये इतके झाले. यामध्ये 51 % इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जून 2021 च्या जीएसटी संकलनाच्या प्रेसनोटमध्ये 1 जुलै ते 5 जुलै 2021 दरम्यान दाखल केलेल्या परताव्यांसाठी 4,937 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाचा देखील समावेश करण्यात आला होता. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी पर्यंतच्या उलाढाल असणाऱ्या करदात्यांना परतावा दाखल करण्याचा करण्यासाठी माफी / कमी व्याज अशा विविध स्वरूपात सवलतीचे उपाय देण्यात आले होते.

सरकारने नियमित परतावा म्हणून आयजीएसटीमधून 24,100 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 28,087 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा जुलै 2021 मधील महसूल 33 टक्के अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल 36 टक्के अधिक राहिला आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या या स्रोतातील महसुलापेक्षा 32 टक्के अधिक राहिला.  

जीएसटी संकलन सातत्याने आठ महिन्यांपर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक झाल्यानंतर जून  2021 मध्ये कमी होऊन 1 लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावरून खाली आला. जून 2021 महिन्यात  संकलन बऱ्यापैकी मे 2021 चे असते. मे 2021 च्या दरम्यान बहुतांश राज्य / केंद्रशासित प्रदेश हे कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने बाधित, तसेच पूर्ण किंवा अंशतः टाळेबंदीच्या अवस्थेत होते. कोविड संबंधी असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलन पुन्हा 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचाच हा एक संकेत म्हणता येईल. आगामी महिन्यांमध्ये देखील जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget