Budget 2022 : AC आणि टेलिव्हिजन यांसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणं स्वस्त होणार?
Budget 2022 :यंदाच्या अर्थसंकल्पात उद्योग जगताला खूप अपेक्षा आहेत. गृहोपयोगी उपकरणं आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उद्योग या आगामी अर्थसंकल्पात तयार वस्तूंच्या आयातीवर उत्पादन शुल्क वाढवण्याची अपेक्षा आहे.
Budget 2022 : कोरोना महामारीच्या काळात देशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. गृहोपयोगी उपकरणं आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उद्योग या आगामी अर्थसंकल्पात तयार वस्तूंच्या आयातीवर उत्पादन शुल्क वाढवण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आयातीला परावृत्त होण्यास मदत होईल, असा विश्वास उद्योगजगताला वाटतो.
अर्थसंकल्पाकडून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला अधिक चांगल्या पावलांची अपेक्षा
उद्योगानं उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेंतर्गत विशिष्ट संशोधन आणि विकास (R&D) प्रकल्पांचे स्थानिकीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देखील मागितलं आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Ciema) ने सांगितलं की, सुमारे 75,000 कोटी रुपयांचा उद्योग देशांतर्गत उत्पादनाला चालना देणाऱ्या काही निर्णयांची अपेक्षा करत आहेत.
तयार मालाच्या आयातीवर उत्पादन शुल्क वाढवण्याची उद्योगांची मागणी
सिएमाचे अध्यक्ष एरिक ब्रेगान्झा म्हणाले की, "स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी, पार्ट्स आणि तयार वस्तूंमध्ये पाच टक्के शुल्काचा फरक असावा. यामुळे उत्पादकांना आवश्यक चालना मिळेल आणि भारतात उत्पादन बेस तयार करण्यात मदत होईल."
एअर कंडिशनरवरील GST घटून 18 टक्क्यांवर यावा
Siema ने LED उद्योगासाठी पुढील पाच वर्षांसाठी कर संरचनेचा रोडमॅप देखील मागितला आहे. जेणेकरून योग्य गुंतवणूक आणि धोरणात्मक हस्तक्षेपांचं नियोजन करता येईल. एरिक ब्रेगान्झा म्हणाले की, उद्योगांना अपेक्षा आहे की, सरकारनं एअर कंडिशनरवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 18 टक्क्यांवर आणावा. याशिवाय, उद्योगानं टेलिव्हिजनवरील (105 सेमी स्क्रीनसह) कर कमी करण्याची मागणी केली आहे.
Godrej Appliances कडूनही अपेक्षा व्यक्त
गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले की, "एअर कंडिशनर्स अजूनही 28 टक्क्यांच्या सर्वोच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात. आम्हाला ते 18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची अपेक्षा आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार? सरकार 'हा' निर्णय घेण्याची शक्यता
- अर्थसंकल्पानंतर लवकरच येणार या 'फार्मा' कंपनीचा IPO, पाच हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी
- मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी उघडा PPF खाते, जाणून घ्या बरेच फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha