एक्स्प्लोर

Budget 2021 | ना मोबाईल फोन, ना कोणाशी संपर्क; बजेट तयार करणाऱ्या टीमची अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतरच सुटका

Union Budget 2021: अर्थसंकल्प तयार करण्याची आणि त्याची छपाई करण्याची पद्धत अत्यंत गुप्त असते. त्यामुळे या अधिकाऱ्यांना कोणाच्याही संपर्कात न येता वेगळं ठेवलं जातं. त्यांच्यावर गुप्तचर खात्याचीही नजर असते.

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 29 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाआधी हा अर्थसंकल्प बाहेर येऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात येते. त्यासाठी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला काही दिवस अर्थमंत्रालयातच, कोणाच्याही संपर्कात न येता रहावे लागते. आजच्या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला गेल्यानंतर या टीमची सुटका होणार आहे.

अर्थसंकल्पाच्या छपाईला 'हलवा सेरेमनी' नंतर सुरुवात करण्यात येते. त्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात येते आणि या टीमला कोणाच्याही संपर्कात न येता पूर्णपणे वेगळं ठेवण्यात येतं

अधिकाऱ्यांना घरी जायला परवानगी नाही अर्थसंकल्प तयार करणे आणि त्याची छपाई करणे ही प्रक्रिया पूर्णपणे गुप्त पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांना काही दिवस जगापासून वेगळं ठेवलं जातं. या अधिकाऱ्यांना घरी जायची परवानगी नसते. त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची सर्व सोय अर्थमंत्रालयाकडून दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे केली जाते. आतमध्ये काम करताना या लोकांचे मोबाईल अथवा इतर सर्व गोष्टी जमा करुन घेण्यात येतात. तसेच आतील सर्व संगणकांचा सर्व्हरशी येणारा संपर्कही तोडण्यात येतो. ज्यावेळी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळी या टीमला बाहेर काढलं जातं.

Union Budget 2021: बजेटच्या दिवशी सोनं खरेदी स्वस्त, सॉवरेन गोल्ड बॉण्ड विक्रीला आजपासून सुरुवात

या वर्षी कोरोनामुळे अर्थसंकल्पाची छपाई न करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. त्यामुळे या वर्षी खासदारांना बजेट संबंधी कागदपत्रे ही डिजिटल स्वरुपात देण्यात येणार आहेत.

गुप्तचर खात्याची नजर सुरुवातीला अर्थसंकल्पासंबंधी कागदपत्रे ही राष्ट्रपती भवनमध्ये छापण्यात येत होती. 1950 सालापासून ही छपाई दिल्लीच्या मिन्टो रोड येथील एका छापखान्यात करण्यास सुरुवात झाली. 1980 सालानंतर हा छापखाना दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सुरु करण्यात आला. तेव्हापासून अर्थसंकल्पासंबंधीची छपाई इथेच करण्यात येत आहे. या इमारतीला सीआयएसएफचे कडक सुरक्षेचे कवच असते. अर्थमंत्रालयाच्या या इमारतीवर गुप्तचर खात्याची बारीक नजर असते.

आज केंद्रीय अर्थमंत्री ज्यावेळी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळी अर्थमंत्रालयातील या टीमला सोडण्यात येईल.

Budget 2021: बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी सरकारकडून पैसा येतो कुठून? उत्पन्नाची माध्यमं कोणती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 02 March 2025Raksha Khadse Daughter News | रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारेे शिवसेनेचे कार्यकर्ते? रोहिणी खडसेंचा आरोप काय?ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 02 March 2025Devendra Fadanvis On Raksha Khadse | रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? गृहमंत्री काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडेसांनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
Ranji Trophy 2024-25: विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
Embed widget