(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BSNL चा धमाका, जुलै महिन्यात 29 लाख नवे यूजर्स जोडले, एअरटेल, वीआय अन् जिओला जोरदार फटका
Mobile Users after Tariff Hike: गेल्या काही दिवसांमध्ये टेलिकॉम कंपन्यांकडून मोबाईल टॅरिफ वाढवण्यात आले होते. जुलै महिन्यात बड्या टेलिकॉम कंपन्यांना फटका बसला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली होती. जुलै महिन्यात जिओ, एअरटेल, वीआय या कंपन्यांकडून मोबाईल रिचार्चच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर बीएसएनएलला फायदा झाला आहे. जुलै महिन्यात जिओ, एअरटेल आणि वीआय या कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. तर, बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत वाढ झाली आहे.
बीएसएनलएलचे यूजर्स 29 लाखांनी वाढले
न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार ट्रायच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे. जुलै महिन्यात सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या यूजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात बीएसएनएलच्या यूजर्सची संख्या 29.4 लाखांनी वाढली आहे. वीआय, जिओ आणि एअरटेलच्या यूजर्सच्या संख्येत घट झाली आहे. जुलै महिन्यात केवळ बीएसएनएल कंपनीचे यूजर्स वाढलेत तर इतर कंपन्यांचे घटलेत.
एअरटेलला सर्वाधिक फटका
भारती एअरटेल कंपनीला सर्वाधिक फटका बसला आहे. एअरटेलच्या मोबाईल यूजर्सच्या संख्येत 16.9 लाखांनी घट झाली आहे. वोडाफोन आयडिया कंपनीच्या यूजर्सच्या संख्येत 14.1 लाखांनी घट झाली आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांच्या संख्येत 7.58 लाखांची घट झाली आहे. टेलिकॉम क्षेत्राचा विचार केला असता जुलै महिन्यात यूजर्सची संख्या घटली आहे. जूनमध्ये 120.564 कोटी वरूुन 120.517 कोटींवर आले आहेत.
जुलै महिन्यात दरवाढ
टेलिकॉम कंपन्यांनी जुलै महिन्यात मोबाईलच्या पॅकेजचे दर वाढवले आहेत.1 जुलैपासून टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांना फटका बसला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी 10 ते 27 टक्क्यांनी दरवाढ केली आहे. जिओ, एअरटेल आणि वीआयनं दरवाढ केली होती. तर, बीएसएनएल कंपनीनं दरवाढ केली नव्हती. त्यामुळं बीएसएनलच्या यूजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केल्यानं अनेक यूजर्सनी पोर्टिंग करत बीएसएनएलची सेवा घेतली होती. बीएसएनएलला फोरजीचं स्पेक्ट्रम मिळाल्यानं त्याचा देखील फायदा झाला आहे.
यूजर्सच्या संख्येत कुठं घट झाली
मोबाईल कंपन्यांच्या दरात वाढ झाल्यानंतर पूर्वोत्तर राज्ये, महाराष्ट्र, राजस्थान, मुंबई, कोलकाता, तामिळनाडू, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश पूर्व, हरियाणा आणि आंध्र प्रदेश मध्ये मोबाइल यूजर्सची संख्या घटली आहे.
इतर बातम्या :
Gold Price : सणासुदीच्या काळात सोनं देणार धक्का, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार एवढे पैसे?