जेव्हा विमान कंपनी बुडत होती, तेव्हा 'बिस्किटे' बनली आधार, तीन महिन्यांत जमले एवढे कोटी
बेकरी उत्पादन कंपनी असलेल्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे.
Britannia industries : बेकरी उत्पादन कंपनी असलेल्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कच्च्या मालाचा नफा 19.55 टक्क्यांनी वाढून 586.50 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 490.58 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीनं ब्रिटानिया ग्रुपच्या गो फर्स्ट एअरलाइनला मोठा आधार दिला आहे.
गो फर्स्ट एअरलाइनला कोणीही विसरू शकणार नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला विमान कंपनीने अचानक त्यांची सेवा बंद केली. त्यानंतर त्यांनी स्वतःहून दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला. त्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. विमान कंपनी गेल्या पाच महिन्यापासून दिवाळखोर झाली आहे. पण ब्रेड आणि बिस्किटांची विक्री करुन कंपनीने या स्थितीतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 586 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवला
कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 586 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्या तिमाहीत कंपनीला 457 कोटी रुपयांचा नफा झाला होता, मात्र मार्च तिमाहीच्या तुलनेत कंपनीला 18 टक्के तोटा सहन करावा लागला होता. तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अडीच टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. ब्रेड आणि बिस्किटे विकून कंपनीने किती कमाई केली आहे.
ब्रेड आणि बिस्किटांपासून कंपनीला मोठा नफा
कच्चा माल नरमल्याने बेकरी उत्पादने उत्पादक कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नफा 19.55 टक्क्यांनी वाढून 586.50 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 490.58 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला सांगितले की या तिमाहीत त्यांची निव्वळ विक्री किरकोळ वाढून 4,370.47 कोटी रुपये झाली, तर सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ती 4,337.59 कोटी रुपये होती. सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1.21 टक्के वाढीसह 4,432.88 कोटी रुपये होते.
6 महिन्यांत 1000 कोटींहून अधिक नफा
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर, गो फर्स्ट बुडल्यानंतर ब्रिटानिया ग्रुपने त्यांच्या FMCG व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. पहिल्या तिमाहीत नफा 457.55 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा नक्कीच चांगला होता, परंतु मार्च तिमाहीच्या तुलनेत तो 18 टक्के कमी होता. यावेळी मात्र तसे नाही. गेल्या दोन तिमाहीत कंपनीने ब्रेड-बिस्किट व्यवसायातून 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
कंपनीचे शेअर्स वाढले
तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येत आहे. BSE कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सकाळी 11:40 वाजता कंपनीच्या शेअरमध्ये 2.11 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. कंपनीचा शेअर 4493.50 रुपयांवर व्यवहार करत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 4569.05 रुपयांवर पोहोचले होते. आज कंपनीचे शेअर्स 4521.35 रुपयांवर उघडले. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 4400.80 रुपयांवर बंद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या: