जगातील सर्वात श्रीमंत लोकांना झटका, संपत्तीत झाली मोठी घट, मुकेश अंबानींसह अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना धक्का
जगातील सर्वात श्रीमंत लोकांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. यामध्ये भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांचाही समावेश आहे.
Bloomberg Billionaires Index: जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपतींची यादी जाहीर करणाऱ्या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने मोठी बातमी दिली आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एका दिवसात 15.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. इलॉन मस्क नंतर बेझोस हे दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत देखील घट झालीय.
जेफ बेझोससह, इतर अब्जाधीशांच्या संपत्तीतही प्रचंड घट झाली. ब्लूमबर्गच्या डेटावर नजर टाकली तर टॉप 22 अब्जाधीशांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत 134 अब्ज डॉलरची घट झाल्याचे निर्देशांकांत उघड झाले आहे.
जेफ बेझोस आणि इतर अब्जाधीशांची संपत्ती का घसरली?
जागतिक बाजारासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत निराशाजनक होता. अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारी दराची आकडेवारी कमकुवत झाल्यानंतर भारतासह जगभरातील बाजारपेठांना घसरणीचा सामना करावा लागला. अमेरिकन शेअर बाजार Nasdaq 100 निर्देशांक 2.4 टक्क्यांनी घसरला होता. या काळात Amazon चे शेअर्स देखील 8.8 टक्क्यांनी घसरले, ज्यामुळे जेफ बेझोसची संपत्ती 15.2 बिलियन डॉलरपर्यंत कमी झाली. जेफ बेझोस यावर्षी अमेझॉनचे शेअर्स सतत विकत आहेत. त्यांनी फेब्रुवारीमध्ये नऊ ट्रेडिंग दिवसांत सुमारे 8.5 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
बेझोसचे एका दिवसातील हे तिसरे सर्वात मोठे नुकसान
बेझोसचे एका दिवसातील हे तिसरे सर्वात मोठे नुकसान आहे. याआधी फक्त 4 एप्रिल 2019 रोजी मॅकेन्झी बेझोससोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 36 अब्ज डॉलरने घसरली होती. त्यावेळी, घटस्फोटाचा समझोता म्हणून मॅकेन्झीने जेफ बेझोसच्या सुमारे 25 टक्के हिस्सेदारी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर 29 एप्रिल 2022 रोजी Amazon चे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरून 124.28 बिलियन डॉलर झाले आहे. त्या दिवशी जेफ बेझोस यांना दुसऱ्यांदा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला.
जेफ बेझोस हे नुकसानीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. परंतू, जगातील 500 श्रीमंत लोकांच्या संपत्तीचाही समावेश केला आहे. तर 134 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळं, इलॉन मस्क आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्टसारख्या इतर अब्जाधीशांच्या संपत्तीतही अनुक्रमे 6.57 अब्ज डॉलर आणि 1.21 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
टॉप 5 अब्जाधीशांपैकी इतरांची काय स्थिती?
जगातील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि मेटा चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती 3.39 अब्ज डॉलरने घटून 174 अब्ज डॉलर झाली आहे. तर पाचवे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची संपत्ती 3.39 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.
भारतातील अदानी-अंबानी यांचाही या यादीत समावेश
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना या कालावधीत 1.20 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर इतकी घसरली आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यानंतर लगेचच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आले. 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्तीही 1.34 अब्ज डॉलरने कमी होऊन 110 अब्ज डॉलरवर आली आहे.