एक्स्प्लोर

Bitcoin | बिटकॉइनच्या किंमतीत वर्षभरात 170 टक्क्यांनी वाढ, 'इतकी' आहे एका बिटकॉइनची किंमत

Bitcoin | मार्चमध्ये बिटकॉइनची किंमत 5 हजार डॉलर इतकी होती. आता त्याची किंमत 23 हजारांच्या जवळ गेली आहे. रुपयाच्या बाबतीत बोलायचं तर आज एका बिटकॉइनची किंमत 16,93,972 इतकी आहे. ऑगस्ट महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम बिटकॉइनची किंमत वाढण्यात झाल्याचं मानलं जातंय.

नवी दिल्ली: डिजिटल करन्सी बिटकॉइनमध्ये तीन वर्षानंतर तेजी आल्याचं पहायला मिळतंय. बिटकॉइनने आपले या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले असून त्याची किंमत आता 20 हजार डॉलर्सच्या पलिकडे गेली आहे. गुरुवारी एका बिटकॉइनची किंमत 22,655 डॉलर्स इतकी झाली आहे. रुपयाच्या बाबतीत बोलायचं तर आज एका बिटकॉइनची किंमत 16,93,972 इतकी आहे. बुधवारी पहिल्यांदाच 20 हजार डॉलर पार केलेल्या बिटकॉइनची किंमत गुरुवारी एका दिवसात 10.5 टक्क्यांनी वाढली.

किंमतीत चौपटीनं वाढ कोरोनाच्या काळात सर्व व्यवहारांवर परिणाम होत असताना बिटकॉइनसाठी मात्र हे वर्ष चांगलं गेल्याचं दिसतंय. मार्चच्या तुलनेत त्याच्या किंमतीत जवळपास चौपट वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. या वर्षी बिटकॉइनच्या किंमतीत तब्बल 170 टक्क्यांची वाढ झाली आहे. कमी काळात जास्त फायदा मिळवण्यासाठी काही बड्या गुंतवणुकदारांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्याने त्याच्या किंमतीत तेजी आल्याचं सांगण्यात येतंय.

सोन्यातील गुंतवणूक घसरली मार्च महिन्यात एका बिटकॉइनची किंमत 5 हजार डॉलर इतकी होती. काही महिन्यातच ती आता 23 हजारांच्या जवळ पोहचली आहे. ऑगस्ट महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यानं बिटकॉइनच्या किंमतीत वाढ झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. ऑगस्टनंतर बड्या गुंतवणुकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली आणि ती बिटकॉइनमध्ये गुंतवली.

तेजी कायम राहण्याचा अंदाज बिटकॉइनमध्ये ही तेजी कायम राहण्याची शक्यता असल्याचं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्यांच्या मते ऑक्टोंबर महिन्यानंतर बिटकॉइन मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. येत्या काळात बिटकॉइनची ही तेजी कायम राहणार असल्याचंही स्पष्ट आहे.

काय आहे बिटकॉइन? बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget