एक्स्प्लोर

मोठी बातमी! PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, 'ही' अट पूर्ण केली तर मिळणार 2000 रुपये

PM Kisan Samman Nidhi Yojana : PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते नुकताच PM किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना (Farmers) वितरीत करण्यात आला आहे. अशातच आता  PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी आणि एनपीसीआय करुन घेणं गरजेचं आहे. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. मात्र, याकडं काही शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. अशा शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता हवा मिळणार नाही. हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांनी या योजनेशी संबंधित सर्व अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.

PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत 

दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, ते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. हे सर्व शेतकरी विभागीय मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. असे दुर्लक्ष पुन्हा झाल्यास 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही.

लोकप्रतिनिधींना PM किसान योजनेचा लाभ मिळणार का?

सरकारने लोकप्रतिनिधींनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधींना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात होते. मात्र, आता महापालिका आणि पंचायत प्रतिनिधींना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या रकमेच्या धर्तीवर लोकप्रतिनिधींनाही तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र, ज्या लोकप्रतिनिधीकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळतेय.  महापालिका संस्थांचे उपाध्यक्ष आणि प्रभाग नगरसेवकांना पीएम सन्मान निधीचा लाभ दिला जाणार आहे. 

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींना अटी काय?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना पात्रता अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीची नोंदणी असणं गरजेचं आहे. तसेच, संस्थात्मक जमिनीची मालकी असणे महत्त्वाचे आहे. अर्जदार शेतकरी किंवा लोकप्रतिनिधी यांची जन्मतारीख 1 फेब्रुवारी 2001 नंतरची नसावी. कुटुंबातील कोणीही घटनात्मक पदावर राहू नये. केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कुटुंबातील कोणीही मंत्री नसावा. याशिवाय कुटुंबातील कोणताही सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेत महापौर, लोकसभा-राज्यसभा किंवा विधिमंडळाचा विद्यमान किंवा माजी सदस्य नसावा.  

महत्वाच्या बातम्या:

PM किसानच्या 16व्या हप्त्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर शेतकऱ्यांनी कुठे करावी तक्रार?

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget