सोन्या चांदीचा खरेदीदारांना पुन्हा झटका, दरात झाली वाढ, कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर?
सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजणक बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.
Gold Silver Price: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजणक बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे. डॉलर निर्देशांक मजबूत होत असताना, जागतिक आणि स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. दिल्ली आणि मुंबईत सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्यासाठी 78480 रुपये तर मुंबईत 10 ग्रॅम सोन्यासाठी 78,330 रुपये मोजावे लागत आहेत.
MCX वर सोन्या चांदीचे दर काय?
जर आपण आजच्या फ्युचर्स ट्रेडिंगवर नजर टाकली तर तो MCX वर सोन्याचा दर 108 रुपयांनी वाढला असून सध्या दर 77825 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. काल तो 77,717 रुपयांवर बंद झाला. या काळात चांदीचा भाव 102 रुपयांनी वाढून 89,275 रुपये प्रतिकिलो झाला. काल तो 89173 रुपयांवर बंद झाला.
कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती ?
दिल्ली : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
मुंबई : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चेन्नई: 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
कोलकाता : 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी वाढून 78,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
अहमदाबाद : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,380 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
बंगळुरू: 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
चंदीगड : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
हैदराबाद : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
जयपूर : 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 330 रुपयांनी वाढून 78,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
लखनौ : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
पाटणा : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,380 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
नागपूर : 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 78,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं ग्राहकांना मोठा फटका
ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या खरेदीमुळे गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढून 79,720 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. बुधवारी सोन्याचा भाव 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. गुरुवारी चांदीचा भावही 130 रुपयांनी वाढून 90,630 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदी 90,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव बुधवारी 330 रुपयांनी वाढून 79,170 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दरम्यान, सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा सवाल उपस्थित केला जात आहे.