(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! दिवाळापूर्वी सोनं चांदी स्वस्त, खरेदीदारांना मोठा दिलासा, नेमकी किती झाली घसरण?
दिवाळीपूर्वी सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे.
Gold Silver Rate : दिवाळीपूर्वी सोने (Gold) चांदी (Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात 1450 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरात (Silver Rate) 3000 रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा संधी आहे.
परदेशात झालेल्या कमी मागणीमुळं सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची किंमत विक्रमी पातळीपासून 1450 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. 3000 रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. सध्या दिल्लीत सोन्या चांदीचा नेमका किती दर आहे याबाबतची माहिती पाहुयात.
दिल्लीत सोने-चांदी किती स्वस्त
ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या मंद मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 80,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर आदल्या दिवशी त्याची किंमत 80,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर गुरुवारी त्याची किंमत 81,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
चांदी 99,000 रुपये प्रति किलोवर
दुसरीकडे, चांदीही विक्रीच्या दबावाखाली राहिली आणि 2,000 रुपयांनी घसरून 1 लाख रुपयांच्या खाली 99,000 रुपये प्रति किलोवर आली. याआधी गुरुवारी चांदीचा भाव 1.01 लाख रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण दिसून आली. व्यापाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक बाजारपेठेतील ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांची कमकुवत मागणी आणि परदेशातील बाजारातील कमजोर कल यामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला.
MCX वर सोन्या-चांदीची किंमत किती?
दुसरीकडे, जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीच्या किमतींबद्दल बोललो तर ते थोड्या वाढीसह बंद झाले आहेत. शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 205 रुपयांच्या वाढीसह 78,532 रुपयांवर बंद झाले. मात्र, व्यवहारादरम्यान सोन्याचा भावही 78,580 रुपयांवर पोहोचला होता. दुसरीकडे, जर आपण चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर शुक्रवारी 102 रुपयांच्या वाढीसह 97,134 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मात्र, चांदीनेही दिवसाचा उच्चांक 98,069 रुपयांवर पोहोचला होता.