स्पोर्ट्सवेअर कंपनी Nike चा मोठा निर्णय, 1600 हून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ? नेमकं कारण काय?
प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर कंपनी Nike ने मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या 2 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
Nike Layoffs : प्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर कंपनी Nike ने मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या 2 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. खर्च कमी करण्याच्या हालचालीचा एक भाग म्हणून ही कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. या टाळेबंदीमुळं जागतिक स्तरावर कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते.
Nike चे जागतिक स्तरावरील स्पर्धक Adidas, Puma आणि JD Sports यांनी देखील यावर्षी नोकरकपात करण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांनी अनावश्यक खर्चात कपात केली आहे.डिसेंबरमध्ये, Nike ने काही उत्पादनांचा पुरवठा कडक करणे, पुरवठा साखळी सुधारणे, व्यवस्थापन स्तर कमी करणे आणि ऑटोमेशनचा वापर वाढवणे यासह पुढील तीन वर्षांत 2 अब्ज डॉलर बचत योजनेची योजना आखली होती. कंपनीने असेही जाहीर केले होते की तिसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या खर्चात सुमारे 400 दशलक्ष डॉलर ते 450 दशलक्ष डॉलर खर्च येईल. कंपनीच्या फाइलिंगनुसार, 31 मे 2023 पर्यंत Nike चे अंदाजे 83,700 कर्मचारी होते.
2024 मध्ये विविध कंपन्यांनी आतापर्यंत 39,496 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले
स्टोर्स आणि वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर किंवा त्याच्या इनोव्हेशन टीममधील कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीचा परिणाम होण्याची अपेक्षा नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
layoffs.fyi वरील ताज्या आकडेवारीनुसार, 154 कंपन्यांनी 2024 मध्ये आतापर्यंत 39,496 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत
अधिकृत आकडेवारीवरून दिसून आले की ब्रिटनची अर्थव्यवस्था 2023 च्या उत्तरार्धात मंदीच्या टप्प्यात गेली आहे. कारण ती डिसेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत 0.1 टक्क्यांनी कमी झाल्याने ती अपेक्षेपेक्षा वाईट 0.3 टक्क्यांनी कमी झाली आहे. बँक ऑफ इंग्लंडने दिलेल्आ माहितीनुसार 2024 मध्ये अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nike Layoff: नवीन वर्षात 'नाईकी' देणार कर्माचाऱ्यांना मोठा धक्का, शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी