जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 'हे' पाच स्टॉक तुम्हाला करतील मालामाल? जाणून घ्या स्टॉप लॉस, टार्गेट काय असावं!
Best Stock Recommendation : सध्या शेअर बाजारात चांगले चढऊतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे योग्य कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.
मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) चांगली तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत बीएसई (BSE) 80 हजार अंकांच्या खाली गेला होता. मात्र आता पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराने 81 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. दरम्यान आज देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami) उत्सव साजरा केला जात आहे. जन्माष्टमीच्या शूभ मुहूर्तावर शेअर बाजारातील वेगवेगळ्या तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत.
स्टॉप लॉस, टार्गेट प्राईस सांगितली
सध्या शेअर बाजाराची चाल तसेच आगामी काळातील चढउतार लक्षात घेऊन शेअर बाजारातील या तज्ज्ञांनी हे शेअर्स सुचवले आहेत. शेअर सुचवताना या गुंतवणूकदारांनी टार्गेट प्राईस, स्टॉप लॉसही सांगितला आहे. हे शेअर्स पोझिशनल ट्रेडिंगसाठीदेखील खरेदी करता येतील असे मत या तज्ज्ञांचे आहे. मात्र रिटेल इन्व्हेस्टर्सना डोळ्यासमोर ठेवून तज्ज्ञांनी हे शेअर्स सुचवले आहेत. झी बिझनेस या हिंदी वृत्तवाहिनीने या बाबत वृत्त दिले आहे.
कोणकोणते शेअर्स खरेदी करावेत, तज्ज्ञांचे मत काय?
1. मेहुल कोठारी यांनी सुचवलेले शेअर्स
Shriram Piston - खरेदी करा
टार्गेट - 2300
स्टॉप लॉस - 1900
2. राकेश बन्सल यांनी सुचवलेले शेअर्स
Igarashi Motors - खरेदी करा
टार्गेट - 950/1000
स्टॉप लॉस - 625
HUL - खरेदी करा
टार्गेट - 3000/3200/3300
स्टॉप लॉस - 2740
3. संदीप जैन यांनी सुचवलेले शेअर्स
Escorts Kubota - खरेदी करा
टार्गेट - 4030/4070
स्टॉप लॉस - NA
Swaraj Engine - खरेदी करा
टार्गेट - 3800/4000
स्टॉप लॉस - NA
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आता 'हे' शेअर पाडणार पैशांचा पाऊस? टाटा आणि अदाणी उद्योग समूहांच्या कंपन्यांचाही समावेश!