हो खरंय! सरकारची 'ही' योजना महिलांना दोन वर्षांत श्रीमंत करणार, करही वाचणार; एकदा वाचाच!
या योजनेच्या माध्यमातून भरघोस पैसे कमवू शकतात. या योजनेतून मिळालेल्या परताव्यावर व्याजही द्यावे लागणार नाही.
मुंबई : परतव्याची ठोस हमी हवी असेल तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांत गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. सरकारच्या अशा काही अनेक योजना आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही भरघोस पैसे मिळवू शकता. विशेष म्हणजे या योजनांत गुंतवणूक केल्यास तोटा होण्याचा धोका नसतो. भारत सरकारने खास महिलांसाठी अशीच एक योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला अवध्या दोन वर्षांत श्रीमंत होऊ शकतात.
मिळते 7.5 टक्के व्याज
सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं खोलावं लागतं. त्यानंतर या खात्याच्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करता येते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (Mahila Samman Saving Certificate Scheme) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत सरकार ठेवलेल्या ठेवीवर तब्बल 7.5 टक्के व्याज देते. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महिला आपल्या सोईनुसार गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवू शकतात.
योजना नेमकी काय आहे?
वर सांगितल्याप्रमाणे सरकारच्या या योजनेचे नाव महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट असे आहे. ही योजना खास महिलांसाठी आहे. महिलांनी आपल्या खात्यात ठेवलेल्या ठेवीवर सरकार 7.5 टक्के व्याज देते. ही एक स्मॉल सेव्हिंग स्किम असून त्यात फक्त दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत महिला खातेधारक जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. 2023 साली ही योजना चालू करण्यात आली होती. मिळणाऱ्या भरघोस परताव्यामुळे अगदी कमी काळात ही योजना प्रसिद्ध झाली आहे.
महिलांना होतो करसवलतीचा फायदा
देशातील महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने ही योजना चालू केली होती. या योजनेत महिलांना 7.5 टक्के व्याजासह करामध्येही सवल मिळते. दोन वर्षांत महिलांनी केलेल्या गुंतवणुकीतून जो परतावा मिळतो, त्याला डीटीएस लावला जात नाही. म्हणजेच महिलांना मिळणारी ही रक्कम कररहित असते. एका आर्थिक वर्षात मिळणारे व्याज जेव्हा 40 ते 50 हजार रुपये असते, तेव्हाच मिळणाऱ्या परताव्यावर टीडीएस लावला जातो. योजनेचे आणखी एक वैशिष्य म्हणजे त्यात 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावेदेखील गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत पैसे गुंतवण्यासाठी खाते खोलायचे असल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, एक चेक अशी कागदपत्रे लागतात.
हेही वाचा :
तयारीला लागा! या आठवड्यात येणार 'हे' दोन जबरदस्त IPO, मालामाल होण्याची नामी संधी!
दिवसाची रात्र अन् रात्रीचा केला दिवस, पठ्ठ्या वडापाव विकून झाला कोट्यधीश, वाचा संघर्षमय कहाणी!
कोट्यधीश उद्योगपतीने हे काय केलं? संपूर्ण संपत्ती दान करून घेतला धक्कादायक निर्णय!