एक्स्प्लोर

Loan Write Off: सामान्यांचं कर्ज थकल्यास लिलाव करतात, बँकांकडून बड्या कर्जदारांचं 10 वर्षात 12 लाख कोटींचं कर्ज रॉइटऑफ

Loan Write Off : गेल्या 10 वर्षांमध्ये बँकांनी 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज राइट ऑफ केल्याचं समोर आलं आहे. मोठ्या थकबाकदीरांकडून थकवण्यात आलेलं कर्ज बँकांकडून राइट ऑफ केलं जातं. 

नवी दिल्ली : एखाद्या सामान्य व्यक्तीनं उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला सिबिल स्कोअर दाखवावा लागतो. सिबिल स्कोअरच्या आधारे बँकांकडून कर्जाचं वाटप केलं जातं. अनेकदा कागदपत्रांची जुळणी आणि निकष लावले जातात त्यामुळं कर्जदाराला कर्ज घेणं हे देखील आव्हानात्मक होऊन जातं. त्यामुळं अनेकदा काही लोक त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अधिक व्याज दरानं कर्ज देणाऱ्या सूक्ष्मवित्त कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकतात. मात्र, गेल्या 10 वर्षात देशातील मोठ्या बँकांनी 12 लाख कोटींचं बड्या थकबाकीदारांचं कर्ज राइट ऑफ केल्याचं समोर आलं आहे. 

बेरोजगारांना किंवा छोट्या कर्जदारांना काही हजार रुपयांसाठी किंवा काही लाखांच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँका तगादा लावतात. प्रसंगी विविध मार्गांचा वापर करुन कर्ज वसुली करतात. याचवेळी बँका मोठं मोठ्या अब्जाधीश असलेल्या कर्जदारांच्या वसुलीबाबत मात्र नरमाईची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतं. अनिल अंबानी, जिंदाल ते जेपी ग्रुप उद्योग समुहाचा कर्ज थकवणाऱ्यांमध्ये समावेश आहे. भारत सरकारनं ससंदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीतून बँकांनी राइट ऑफ केलेल्या कर्जाच्या रकमेची माहिती समोर आली आहे.  गेल्या 10 वर्षात बँकांनी 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. 

थकबाकीदारांचं कर्ज राइट ऑफ करण्यामध्ये सर्वात पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं गेल्या पाच वर्षात जवळपास दीड लाख कोटी रुपयाचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. थकलेल्या कर्जाला राइट ऑफ करण्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं प्रमाण जास्त आहे. 
 
स्टेट बँक ऑफ इंडियानं गेल्या पाच वर्षात जवळपास दोन लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. तर,सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षात साडे सहा लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ केलं आहे. कर्ज राइट ऑफ करणं म्हणजे बँका असा विचार करते की त्या कर्जाची वसुली होण्याची शक्यता कमी आहे. बँका त्याचवेळी एखाद्या सर्वसामान्य नागरिकाकडून कर्ज थकल्यास त्याच्या संपत्तीचा लिलाव करतात.

इतर बातम्या :

Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 

IPO Update : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओतून गुंतवणूकदार मालामाल,लिस्टींगलाच पैसे दुप्पट,100 टक्के परतावा

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget