Bank Holidays in January 2023 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 14 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Maharashtra Bank Holidays in January 2023 : जानेवारी महिन्यात 14 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
![Bank Holidays in January 2023 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 14 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा bank holidays in january 2023 complete list of Maharashtra bank holidays marathi news Bank Holidays in January 2023 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 14 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/489dbcbfee9d96382d524b2b3820ba5e1672301563233358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bank Holidays in January 2023 : 2022 वर्ष संपून नवीन वर्ष 2023 सुरु व्हायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तसेच शुभमुहूर्त म्हणून अनेकजण आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक करण्याचा विचार करतात. या निमित्ताने बॅंकेत अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे तुमची जर काही महत्त्वाची कामं असतील तर आत्ताच उरकून घ्या. कारण जानेवारी महिन्यात 14 दिवस बॅंका बंद (January Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार जानेवारी महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद ( January Bank Holidays) असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यात एकूण 14 दिवस बँक सुट्टी (January Bank Holidays) असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in January 2023) :
1 जानेवारी 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
2 जानेवारी 2023 : आयझॉलमध्ये (Aizawl) नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बँका बंद
3 आणि 4 जानेवारी 2023 : गान-नागाई, मोइनू इरतपामुळे इंफाळमध्ये बॅंका बंद
8 जानेवारी 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
14 जानेवारी 2023 : दुसरा शनिवार
15 जानेवारी 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
16 आणि 17 जानेवारी 2023 : चेन्नईमध्ये तिरुवल्लुवर डे आणि उझावर तिरुनालच्या निमित्ताने बँका बंद
22 जानेवारी 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 जानेवारी 2023 : त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त बॅंका बंद
26 जानेवारी 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त बॅंका बंद
28 जानेवारी 2023 : शनिवार (महिन्याचा चौथी शनिवार)
29 जानेवारी 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
KFin Technologies Listing: KFin Technologies शेअर दरात लिस्टिंगनंतर घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावे?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)