एक्स्प्लोर

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.

Bank Holidays in April 2023 : मार्च महिना संपून आता एप्रिल महिना सुरु होईल. अशातच वर्षाचा चौथा महिना सुरु होण्यापूर्वी (Bank Holidays in April 2023) बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking)  लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. जर तुम्हाला बँकेतील काही महत्त्वाचं काम एप्रिल महिन्यात पूर्ण करायचं असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे.   

एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका बंद (April Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यात एकूण 15 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in April 2023) :

1 एप्रिल 2023 : वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील. 

2 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

4 एप्रिल 2023 : महावीर जयंती

5 एप्रिल 2023 : बाबू जगजीवन राम जयंतीनिमित्त तेलंगणामध्ये बँका बंद राहतील.

7 एप्रिल 2023 : गुड फ्रायडेमुळे आगरतळा, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

8 एप्रिल 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार

9 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

14 एप्रिल 2023 : बाबासाहेब आंबेडकर जयंती

15 एप्रिल 2023 : आगरतळा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुअनंतपुरममध्ये विशू, बोहाग बिहू, हिमाचल डे, बंगाली नववर्षामुळे बँका बंद राहतील. 

16 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 एप्रिल 2023 : जम्मू आणि श्रीनगरमध्ये शब-ए-कद्र रोजी बँका बंद राहतील. 

21 एप्रिल 2023 : ईद-उल-फित्रमुळे आगरतळा, जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील. 

22 एप्रिल 2023 : महिन्याचा चौथा शनिवार

23 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

30 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकता. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

LPG Subsidy : केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'गिफ्ट', एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहनCity 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines  17 June 2024Mallikarjun Kharge On Wayanad Lok Sabha : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार- खर्गे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
Embed widget