एक्स्प्लोर

Bank FD Rates : 'या' सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ, एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर; यादी पाहा

FD Interest Rate : काही सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ करण्यात आली असून एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर देण्यात येत आहे.

Bank FD Interest Rate Update : नवीन वर्ष सुरु होताच अनेक बँकांनी व्याज दरात (Bank FD Interest Rate) बदल केला आहे. काही सरकारी बँकांकडून (Banks) व्याज दरात वाढ करण्यात आली असून एफडीवर (Fixed Deposit) 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर देण्यात येत आहे. काही बँकांनी खास मुदत ठेव योजनांची अंतिम तारीख वाढवला आहे. एफडी योजनांचा कालावधी वाढल्याने गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), फेडरल बँक (Federal Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) या बँकांनी जानेवारी 2024 मध्ये एफडीवरील व्याज दरात बदल केला आहे. या बँकांचे नवे व्याज दर काय आहेत, ते जाणून घ्या.

जानेवारी महिन्यात 'या' बँकांच्या व्याज दरात बदल (Bank FD Interest Rates in January 2024)

पीएनबी (PNB), बीओबी (BOB), फेडरल बँक आणि आयडीआय बँक या बँकांनी 2024 नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात FD वरील व्याज दरात बदल केला आहे. जानेवारी 2024 मध्ये कोणत्या बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत? पाहा.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank FD Interest Rate)

PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने जानेवारी महिन्यात दोन वेळा एफडीवरील दरात बदल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेने एकाच कार्यकाळात 80 बेसिस पॉइंट्सने दर वाढवला. PNB बँकेने सामान्य ग्राहकांसाठी 300 दिवसांच्या FD वर 80 bps ने व्याजदर 6.25 टक्क्यांवरून वाढवून 7.05 टक्क्यांपर्यंत केला. ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के तर अति ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के व्याज दिलं जात आहे. PNB बँक नियमित ग्राहकांसाठी 3.50 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक 4 टक्के ते 7.75टक्के दरम्यान व्याज देण्यात येत आहे.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda FD Interest Rate)

बँक ऑफ बडोदाने नवीन मॅच्युरिटी कालावधीसह विशेष शॉर्ट टर्म एफडी लाँच केली आहे. यामध्ये ग्राहकांना जास्त व्याज मिळते. नवीन एफडी व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी लागू आहेत आणि 15 जानेवारी 2024 पासून नवे व्याज दर लागू करण्यात आले आहेत. बँकेने 360D (bob360) नावाची नवीन मॅच्युरिटी एफडी योजना लाँच केली आहे, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याज मिळते. तर, बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना 7.60  टक्के व्याजदर देते. आता, बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 4.45 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट जास्त व्याजदर देण्यात येत आहेत.

फेडरल बँक (Federal Bank FD Interest Rate)

फेडरल बँकेनेही मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात बदल केला आहे. फेडरल बँकेने 500 दिवसांसाठीचा व्याजदर 7.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25 टक्के इतका वाढवला आहे. फेडरल बँक आता 500 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 8.40 टक्के परतावा देत आहे. 1 कोटी ते 2 कोटी रुपयांच्या रकमेसाठी न काढता येण्याजोग्या एफडीचा (Non-Withdrawal FD) व्याजदर (Interest Rate) 7.90 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. सध्या फेडरल बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांसाठी 3 टक्के ते 7.75  टक्के दरम्यान FD व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर 3.50 टक्के ते 8.25 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

आयडीबीआय बँक (IDBI Bank FD Interest Rate)

आयडीबीआय बँकेने एफडीवरील व्याजदरातही बदल केला आहे. आता आयडीबीआय बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांसाठी 3 टक्के ते 7  टक्के दरम्यान FD व्याज दर देत आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 3.50 टक्के ते 7.50 टक्के आहे. हे दर 17 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Top 5 Richest Men : जगातील 'या' 5 व्यक्तींकडे कुबेराचा खजिना! रोज मिलियन डॉलर खर्च केले तरी, सुमारे 500 वर्ष संपणार नाही पैसा

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Embed widget