बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्या 'या' शहरात बँका राहणार बंद, सविस्तर माहिती एका क्लिकवर
देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उद्या (20 मे) पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही शहरातील बँका बंद (Bank Closed) राहणार आहेत.
Bank Closed Loksabha Election : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उद्या (20 मे) पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील काही शहरातील बँका बंद (Bank Closed) राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्यांनी ही यादी तपासून घराच्या बाहेर पडावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल.
'या' शहरांमध्ये बँका राहणार बंद
उद्या (20 मे) देशभरातील 49 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. त्याआधी आज रविवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामुळे 20 मे रोजी मुंबई, लखनौ आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहणार आहेत. या पाचव्या टप्प्यात ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, लडाख, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यातील काही शहरात मतदान होणार आहे. तेथील बँका बंद राहणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी मोबाईल फोन, एटीएम आणि इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल बँकिंगचे व्यवहार करावेत. मे महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि चार रविवार वगळता बँकांना एकूण नऊ विशेष सुट्ट्या आहेत.
आणखी मतदानाचे तीन टप्पे शिल्लक
दरम्यान, देशात 18 व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे आणि 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता उद्या 20 मे रोजी मतदानाचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती तयारी झाली आहे. कालच प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या आहेत. उद्या होणाऱ्या मतदानानंतर आणखी देशात दोन टप्पे शिल्लक राहणार आहे. यामध्ये एक टप्पा म्हणजे सहावा टप्पा 25 मे रोजी तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 1 जून रोजी पार पडणार आहे. तर 4 जून रोजी 18 व्या लोकसभेचा निकाल लागणार आहेत. दरम्यान, ज्या शहरात मतदान प्रक्रिया पार पडते तिथे बँकांना सुट्ट्या जाहीर केल्या जातात.
महत्वाच्या बातम्या: