15000 चे झाले 32000 ! थेट पैसे दुप्पट, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO मुळे हजारो गुंतवणूकदार श्रीमंत
बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी आज शेअर बजारावर सूचिबद्ध झाली. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे थेट दुप्पट झाले आहेत.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची (Bajaj Housing Finance IPO) चर्चा होती. ग्रे मार्केटमध्येही या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतर लोकांनी त्यात भरभरून गुंतवणूक केली केली होती. या आयपीओचा एक तरी लॉट मिळावा गुंतवणूकदार अक्षरश: देवाकडे प्रार्थना करत होते. दरम्यान, आज हा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला आहे. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे थेट दुप्पट झाले आहेत. ज्या लोकांनी साधारण 15000 रुपयांचा एक लॉट थेट 32000 रुपयांचा झाला आहे.
114 टक्क्यांनी वाढले मूल्य
बजाज उद्योग समूहाचा बजाज हाऊसिंग फायनान्स या आयपीओला रेकॉर्डतोड प्रतिसाद मिळाला आहे. हा आयपीओ सोमवारी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला. आज सकाळी दहा वाजता सूचिब्ध झाल्यानंतर तो तब्बल 114 टक्क्यांच्या बम्पर प्रिमियमवर शेअर बाजारावर लिस्ट झाला. म्हणजेच या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना थेट मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत.
बीएसई, एनएसईवर नेमका किती रुपयांवर लिस्ट झाला
बजाज हाऊसिंग फायनान्सचा हा शेअर आज सकाळी बीएसईवर 114.29 टक्क्यांच्या प्रिमियमने 150 रुपयांवर लिस्ट झाला. तर हाच शेअर एनएसईवर 80 रुपयांनी म्हणजेच 114.29 टक्क्यांच्या प्रिमियमसोबत 150 रुपयांवर लिस्ट झाला आहे.
गुंतवणूकदारांना प्रत्येक लॉटवर नेमका किती फायदा झाला?
बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा त्याचा किंमत पट्टा 66-70 निश्चित करण्यात आला होता. अपर प्राईस बँडचा विचार करायचा झाल्यास या कंपनीचा प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना 80 रुपयांची कमाई झाली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 214 शेअर होते. म्हणजेच या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी 14980 रुपयांची गुंतवणूक केली होती. हा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या एका लॉटचे मूल्य वाढून थेट 32,100 रुपये झाले आहे. म्हणजेच प्रत्येक लॉटवर गुंतवणूकदारांना तब्बल 17,120 रुपयांची कमाई झाली आहे.
बजाजच्या आयपीओने रचला नवा रेकॉर्ड
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी तीन दिवसांत तब्बल 89 लाखपेक्षा अधिक अर्ज आले होते. कोणत्याही भारतीय आयपीओसाठी आतापर्यंत हे सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. हा आयपीओ साधारण 6500 कोटी रुपयांचा होता. मात्र या आयपीओसाठी तब्बल 3.23 लाख कोटी रुपयांची बोली लावली होती.
हेही वाचा :
पैसे ठेवा तयार! लवकरच येणार स्विगाचा मोठा आयपीओ, पैसे कमवण्याची जबरदस्त संधी
UPI व्यवहाराबाबत नवा नियम, आता 500000 रुपयांपर्यंत करता येणार डिजिटल पेमेंट!
रिटायरमेंटचं प्लॅनिंग करताना 'या' पाच चुका कधीच करू नका, अन्यथा म्हातारपणी होऊ शकते आर्थिक अडचण!