एक्स्प्लोर

बाबा रामदेव 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार

पतंजलीचे संस्थापक योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) येत्या काही दिवसांत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

Baba Ramdev on Viksit Bharat: पतंजलीचे संस्थापक योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) येत्या काही दिवसांत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विकसित भारत निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना त्यांनी गुंतवणुकीबाबत वर्तव्य केलं. या प्रस्तावित गुंतवणुकीमुळं हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधी (Employment opportunities) निर्माण होणार आहेत. बाबा रामदेव उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 (uk Global investors summit 2023) मध्ये सहभागी झाले होते. समिट दरम्यान त्यांनी 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

या उद्योगपतींनी समिटला लावली हजेरी 

बाबा रामदेव उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 मध्ये सहभागी झाले होते. ही शिखर परिषद आज 8 डिसेंबरपासून सुरू झाली असून 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झाले. अदानी समुहाचे संचालक आणि कृषी आणि तेल आणि वायू व्यवसायाचे प्रमुख प्रणव अदानी, JSW MD सज्जन जिंदाल, ITC MD संजीव पुरी, Emaar India CEO कल्याण चक्रवर्ती, TVS सप्लाय चेन सोल्युशन्सचे अध्यक्ष आर. दिनेश आदी या समिटला उपस्थित आहेत.

बाबा रामदेव यांचे गुंतवणूकदारांना आवाहन

बाबा रामदेव यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या व्हिजनचा उल्लेख केला. त्यांनी सर्व गुंतवणूकदारांना भारताचा विकास करण्याचा आणि देशाला जागतिक आर्थिक शक्तीस्थान बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प बळकट करण्याचे आवाहन केले. बाबा रामदेव यांनी देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा उल्लेख देखील केला. तसेच विकसित भारतासाठी पतंजलीच्या योगदानाबाबतही बाबा रामदेव यांनी माहिती दिली. 

10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार

बाबा रामदेव म्हणाले की पतंजली गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीमध्ये योगदान देत आहे. पतंजलीकडून 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी परिषदेत पंतप्रधानांना दिले. या गुंतवणुकीमुळं आगामी काळात 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नवीन भारत निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे बाबा रामदेव यांनी कौतुक केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना त्यांनी कॉर्पोरेट घराण्यांना उत्तराखंडमध्ये युनिट्स स्थापन करण्याचे आवाहनही केले.

या उद्योगपतींनी केल्या घोषणा

परिषदेदरम्यान सज्जन जिंदाल यांनी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. धार्मिक स्थळांची जोडणी सुधारण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, TVS सप्लाय चेनचे आर दिनेश यांनी राज्यातील विद्यमान प्लांटच्या विस्ताराची घोषणा केली. त्यांनी सांगितले की त्यांची कंपनी  गुंतवणूक वाढवेल. ज्यामुळे 7 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होतील. राज्यातील पहिले विशेष बहु-कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबतही त्यांनी माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Ramdev Baba : पतंजलीच्या बदनामीसाठी षडयंत्र, बाबा रामदेव यांचा आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget