एक्स्प्लोर

5 लाखांपर्यंतचे आरोग्य उपचार मोफत; केंद्र सरकारची 'आयुष्मान भारत योजना', कसा कराल अर्ज?

Ayushman Bharat Health Scheme: देशातील गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी सरकार आयुष्मान भारत योजना चालवत आहे. आतापर्यंत देशातील कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Ayushman Bharat Health Scheme: देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला मोफत आरोग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारकडून 'आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना' (Ayushman Bharat Yojana) राबवण्यात येत आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेअंतर्गत सरकारकडून जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. आतापर्यंत देशातील साडेचार कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारनं 2018 मध्येही योजना सुरू केली आहे. नुकतंच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr. Mansukh Mandaviya) यांनी संसदेत या योजनेसंदर्भात माहिती दिली.  तसेच, आतापर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींचा आकडाही सांगितला. 

केवळ तीन महिन्यांत कोट्यवधी लोकांना लाभ 

डॉ. मनसुख मांडविया (Dr. Mansukh Mandaviya) यांनी संसदेत या योजनेसंदर्भात बोलताना सांगितलं की, "आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Health Scheme News) ही जगातील सर्वात मोठी आरोग्य संरक्षण योजना बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील 4.5 कोटी लोकांनी एक रुपयाही खर्च न करता या योजनेचा लाभ घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. सप्टेंबर महिन्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 3.8 कोटी होती. गेल्या तीन महिन्यांत सुमारे एक कोटी लोक या योजनेत सहभागी झाली आहेत."

केंद्रीय आरोग्य मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, "आगामी काळात सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये इंटीग्रेटिव्ह मेडिसिनसाठी (Integrative Medicine) स्वतंत्र विभाग तयार करण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्नशील आहोत."

सरकारकडून मिळतं 'गोल्डन कार्ड'

कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. 'आयुष्मान भारत योजना' ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड' (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

कोण करु शकतं अर्ज? 

आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana News) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचं नाव SECC–2011 मध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, SECC म्हणजे काय? SECC म्हणजे, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

असा करा ऑनलाईन अर्ज 

  • सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. 
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा. 
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  • तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.
  • मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number) किंवा RSBY URN नंबर टाका.
  • जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. 
  • तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.
  • याशिवाय, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sovereign Gold Bond: सोन्यात गुंतवणूक करायचीये? सरकार विकतंय स्वस्तात सोनं, काय आहेत फायदे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget