एक्स्प्लोर

Apple मुळे भारतीयांना मोठा फायदा; 1 कोटी 50 लाख रोजगाराच्या संधी, केंद्र सरकारच्या योजनेला मोठं यश

Apple Jobs India : ॲपल (Apple) कंपनीमुळे भारतीयांसाठी 1 कोटी 50 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेला मोठं यश मिळालं आहे.

Apple Created 1.50 Lakh Job Apportunityॲपल (Apple) कंपनीमुळे भारतीयांना मोठा फायदा झाला आहे. ॲपल कंपनीने (Apple Company) भारतात (India) प्रत्यक्ष (Direct Jobs) आणि अप्रत्यक्षपणे (Indirect Jobs) 1 कोटी 50 लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. केंद्र सरकारकडून ही आकडेवारी समोर आली आहे. ॲपल कंपनीने उत्पादक (Manufacturers) आणि पुरवठादार (Component Suppliers) यांच्यामार्फत भारतामध्ये सुमारे 50,000 थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत.

ॲपल कंपनीने थेट नोकऱ्यांव्यतिरिक्त, मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमद्वारे (Manufacturing Ecosystem) देशात भविष्यासाठी सुमारे 1,00,000 अप्रत्यक्ष नोकऱ्यांच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम म्हणजे काय?

मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम (Manufacturing Ecosystem) म्हणजे उद्योगाचे नेटवर्क. यामध्ये बाजार-निर्मिती करणारे उत्पादक आणि ग्राहक हे सर्व एकत्र मिळून काम करतात.

ॲपलमुळे भारतीयांसाठी 1 कोटी 50 लाख रोजगाराच्या संधी

फॉक्सकॉन (Foxconn), विस्ट्रॉन (Wistron) आणि पेगाट्रॉन (Pegatron) या कंपन्या भारतातातील ॲपलच्या आयफोनसाठी कंत्राटी उत्पादक आहेत. सनवोडा, एवरी, फॉक्सलिंक आणि सालकॉम्प हे या कंपन्यांचे पुरवठादार आहेत. यामुळे ॲपलकडून प्रत्यक्षपणे 50 हजार रोजगार उपलब्ध झाले आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 1 कोटी रोजगार उपलब्ध होऊ शकतात. केंद्र सरकारच्या (PLI) योजनेचे हे मोठं यश आहे.

काय आहे केंद्र सरकारची PLI योजना?

भारतातील उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून 2020 मध्ये  प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना सुरु करण्यात आली. पीएलआय योजनेच्याच्या माध्यमातून देशातील औद्योगिक उत्पादन वाढवून आयात खर्च कमी करणे हा सरकारचा प्रयत्न होता.

रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकारची योजना

परदेशी कंपन्यांना भारतात त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आमंत्रित करण्याव्यतिरिक्त, या योजनेचा उद्देश देशांतर्गत कंपन्यांना देशात त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा यामागे सरकारचा उद्देश आहे.

भारतामधील आयफोन निर्यात वर्षभरात दुप्पट होणार

भारतामधून ॲपल कंपनीच्या आयफोनची निर्यात एप्रिलनंतर पाच महिन्यात एक बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. 2023 मध्ये भारतामधील आयफोन निर्यात दुप्पाट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, युरोप आणि मध्ये पूर्व देशांमध्ये भारतामधील आयफोन निर्यात केले जातात. कडेवारीनुसार, मार्च 2023 पर्यंत आयफोनची भारतामधील निर्यात 2.5 बिलियन डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

मार्च 2022 पर्यंत भारतामधून 1.3 बिलियन डॉलर मूल्यांची आयफोनची निर्यात झाली होती.  मार्चमध्ये ही निर्णायत दुप्पट होण्याची शक्यता आहे. ॲपल कंपनी जास्तीत जास्त आयफोन चीनमध्ये तयार करते, पण मागील काही दिवसांपासून ॲपल कंपनीनं धोरणांमध्ये बदल केलाय. अमेरिका आणि चीनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर ॲपल कंपनीनं भारताला पंसती दर्शवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आयफोन निर्मितीमध्ये भारत चीनला मागे टाकू शकतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget