कसं घडलं शून्यातून विश्व? अनिल अग्रवाल यांनी सांगितला वेदांताचा प्रवास
Vedant Foxconn Project: वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
Vedant Foxconn Project: वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपमुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यातच फॉक्सकॉन या कंपनीसोबत वेदांत कंपनीचा करार आहे. मात्र ही वेदांत कंपनी आहे काय? या प्रकल्पामधून नेमकं काय उभारलं गेलं असतं, याबाबत स्वतः वेदांचे अनिल अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी या कंपनीचा प्रवास आणि प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, ''आम्ही बिहारचे आहेत. आम्ही जास्त विचार करत नाही, फक्त पुढे वाढत राहतो.''
'नवीन संधीसाठी लंडनला गेलो'
अनिल अग्रवाल म्हणाले की, 19 वर्षांचा असताना 1975 मध्ये मी मुंबईला आलो. पुढे खूप संघर्ष केला. इंग्रजी येत नव्हती. मात्र बोलता-बोलता हळूहळू शिकलो. पुढे अमेरिकेला गेलो आणि तिथे काही वर्ष राहिलो. तिथेच माझ्या मुलीचा जन्म झाला. नंतर मी लंडनला गेलो आणि नंतर पुढे वाढतच गेलो. ते म्हणाले, एक काळ असा होता जेव्हा रात्री दोन वाजताही घरी गेलो, तर बायको हातात थाळी घेऊन उभी असायची. नंतर मी घरी गेलो की, आम्ही एकत्र बसून जेवत होतो. आज मोठं घर झालं आहे, मुलंही परदेशात गेली. आता घरी गेलो की कोणी नसतं.
'अशी कंपनी बनवणायची आहे जी पुढील 500 वर्ष राहील'
केन इंडीआयचे वेदांतात विलीनीकरण झालं आहे. आता तुम्ही जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. त्यासाठी तुमची काय योजना आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, मी कोणतीही स्पर्धा नाही करत आहे. मला एक अशी कंपनी बनवणायची आहे जी पुढील 500 वर्ष राहील. अशी बनवणायची आहे, ज्यात मंदिर आणि त्यात कोणतंही अंतर नाही राहिलं पाहिजे. जी कंपनी आमचं कुटुंब नाही चालवणार. टाटाचे जे मॉडेल आहे. त्यांनी 66 टक्के चॅरिटीत दिले आहे. आम्ही बिहारचे आहोत. आम्ही 75 टक्के लोकांना देणार. हे पैसे आम्ही नंदवन बनवण्यासाठी देणार. माझी इच्छा आहे की, एक अशी कमी आयला हवी जी स्वतःहून चालेल. ही कंपनी लोकांनी लोकांसाठी चालवलेली कंपनी असलं.
कंपनी पुढे कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक करणार, असं त्यांना विचारलं असता अनिल अग्रवाल म्हणाले की, आम्ही पुढे तेलाच्या उत्पादनात, अॅल्युमिनियम, सिल्व्हरच्या उत्पादनात गुंतवणूक करू. आम्ही ग्लास बनवतो, तैवान, कोरियामध्ये आणि सेमीकंडकत यात माझं विशेष लक्ष लागलं आहे. याच्या अनेक कंपन्या उभारायचा आहेत. जेणेकरून इलेक्ट्रिक वस्तू बानू शकेल. येणाऱ्या काळात आमची इच्छा आहे की, 20 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक कंपनीत करावी. आमच्याकडे पैशाची कमी नाही. मी आजपर्यंत माझ्या पगाराशिवाय एकही रुपया घेतला नाही. तसेच अद्याप एक शेअरही विकला नाही. यात 5 बिलियन डॉलर्स तंत्रज्ञानवर खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.