एक्स्प्लोर

मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेतो, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, निधीत वाढ करणार : अजित पवार

जोपर्यंत मी इथं आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) बंद करण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं.

Ajit Pawar on Ladki Bahin Scheme : जोपर्यंत मी इथं आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) बंद करण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहिण योजनेच्या यशाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.  आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की, ही योजना बंद होऊ देणार नाही असेही अजित पवार म्हणाले. 

अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा 7500 रुपयांचा हप्ता मिळाला 

आधी या योजनेच्या व्यवहार्यतेवर आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी सातत्याने विरोध केला होता. ही योजना अंमलात आल्यानंतर आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल, असे विरोधक पसरवताय. लाडकी बहीण योजनेबद्दल सांगताना अजितदादा म्हणाले की, महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांचा वापर केला आहे. दुसऱ्या एका घटनेत एका महिलेने दोन महिन्यांचा हप्ता आणि स्वत:च्या बचतीतून शिवणयंत्र विकत घेतले आहे. राज्यभरात अशा अनेक महिलांच्या यशोगाथा समोर येत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण 7500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की ही योजना बंद होऊ देणार नाही

राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 1500 रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद केल्याचा दावा केला असला तरी तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो. मी ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असे अजित पवार म्हणाले. निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आगामी निवडणुकीत ही योजना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देतील.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : नाना धन्यवाद, नार्वेकर पुन्हा आले,पहिल्याच भाषणात चौकार-षटकारKolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलंRahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Jayant Patil Speech: देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Embed widget