Air Travel: दिलासादायक! विमान प्रवास होणार स्वस्त, जेट इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण
विमान प्रवास (Air Travel Cheap) करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांच्या वाढीनंतर आजपासून सुरु झालेल्या सप्टेंबर महिन्यात जेट इंधनाच्या (Fuel) किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.
Air Travel Cheap: विमान प्रवास (Air Travel Cheap) करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांच्या वाढीनंतर आजपासून सुरु झालेल्या सप्टेंबर महिन्यात जेट इंधनाच्या (Fuel) किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. त्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे (Flight tickets) स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेट इंधनाच्या किंमती नेमक्या किती कमी झाल्या याबाबतची माहिती पाहुयात.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य लोक आणि विमान कंपन्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. सलग दोन महिने जेट इंधनात वाढ केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात घट झाली आहे. त्यानंतर हवाई भाडे कमी होण्याची शक्यता बळावली आहे. जेट इंधनात वाढ झाल्यामुळं विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यामुळं त्यांना हवाई भाडे वाढवावे लागले आहे. जेट इंधनात कपात केल्यानंतर कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशाच्या चार महानगरांमध्ये जेट इंधन किंवा एअर टर्बाइन इंधनाची किंमत काय आहे हे देखील सांगूया?
एटीएफ किती स्वस्त झाला?
ऑगस्ट महिन्यात देशाची राजधानी दिल्लीत एटीएफची किंमत 97,975.72 रुपये प्रति किलोलीटरवरून 93,480.22 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,495.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात कोलकात्यात ATF ची किंमत 1,00,520.88 रुपये प्रति किलोलीटरवरून 96,298.44 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,222.44 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात मुंबईतील एटीएफची किंमत 91,650.34 रुपये प्रति किलोलीटरवरून 87,432.78 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,217.56 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात चेन्नईमध्ये ATF ची किंमत 1,01,632.08 रुपये प्रति किलोलीटर वरून 97,064.32 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,567.76 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
जेट इंधनावर कमी खर्च करावा लागणार
देशांतर्गत विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधनावर कमी खर्च करावा लागणार आहे. आता अशा विमानांना दिल्ली विमानतळावर 39.68 डॉलर स्वस्त जेट इंधन मिळेल. आता ऑगस्टच्या तुलनेत किंमत कमी होऊन 852.12 डॉलर प्रति किलोलिटर झाली आहे. त्याचवेळी, कोलकाता विमानतळावर जेट इंधनाची किंमत 39.65 डॉलरने कमी होऊन 890.85 डॉलर प्रति किलोलिटर झाली आहे. मुंबईत किमती 39.72 डॉलरने कमी होऊन सध्याची किंमती 851.34 डॉलर प्रति किलोलिटर दिसत आहेत. तर चेन्नईमध्ये किंमत प्रति लीटर 846.99 डॉलरवर वर पोहोचली आहे. तिथं किंमत प्रति किलोलिटर 39.65 डॉलरने कमी झाली आहे.