एक्स्प्लोर

Adani Group: अदानी ग्रुपवर 250 दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचा गंभीर आरोप, अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केली? काय आहे प्रकरण?

Adani Group: अदानी ग्रुपवर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत. अमेरिकन कोर्टाने भारतात कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी लाच दिल्याचा आरोप केला आहे.

Adani Group: भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन न्यायालय आणि नियामकाने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावरील हा आरोप कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल आहे. यानंतर, अदानी समूहाने गुरुवारी 600 दशलक्ष डॉलर्स किमतीचे बॉन्डही रद्द केल्याचे समजत आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने आपल्या एका अहवालात याचा उल्लेख केला आहे.

काय आहे प्रकरण?

अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी यांनी कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी आणि ते लपवण्यासाठी $265 दशलक्ष डॉलर्स (₹2,236 कोटी) लाच दिल्याचा आरोप केला आहे. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर कंपन्यांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) यांनी अदानी समूहाचे काही अधिकारी आणि गौतम अदानी यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर हे आरोप केले आहेत. या आरोपात गौतम अदानी यांनी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारत सरकारला 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचे म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप?

या आरोपात अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभे करून ते लपविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात सागर अदानी, विनीत अदानी, इंडिया रिन्यूएबल्स-एनर्जी कंपनी यांनाही आरोपी सांगण्यात आले आहे. न्यू यॉर्क कोर्टाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची एक विशिष्ट योजना आखण्यात आली आहे जेणेकरून त्यांना अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळू शकेल.

अदानी समूहाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही..

अदानी समूहाने स्वत:च्या फायद्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला आणि ऊर्जा करार जिंकण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना अयोग्य पेमेंट केले का, याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

250 मिलीयन डॉलरची लाचखोरी? 

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप आहे. भारतात सौरऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी अदानी यांनी 250 दशलक्ष डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले होते, असा आरोप आहे की अदानी यांनी लाचेची रक्कम गोळा करण्यासाठी अमेरिकन आणि परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलले. गौतम अदानी यांच्यासह आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

काँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्लाबोल

अमेरिकेत अदानींवर आरोप झाल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अदानी घोटाळ्याबाबत आम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहोत, पुन्हा एकदा जयराम रमेश यांनी जेपीसी चौकशीची मागणी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget