Adani : अदानी समूह आता आरोग्य क्षेत्रात उतरणार; या समूहात गुंतवणूक करण्याच्या हालचाली
Adani in Healthcare Sector: विविध उद्योग, सेवा क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणारा अदानी समूह आता आरोग्यक्षेत्रात उतरणार असून त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Adani In Healthcare Sector: हवाई क्षेत्र, तेल, ऊर्जा, बंदर आदी विविध क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या गौतम अदानी यांचा अदानी समूह आता आरोग्य क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. डायग्नोस्टिक आणि रुग्णालय क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये अदानी समूह आपली भागीदारी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
देशभरात डायग्नोस्टिक केंद्र असणाऱ्या मेट्रोपोलिस हेल्थकेयर लिमिटेड (Metropolis Healthcare Ltd) मधील बहुसंख्य समभाग खरेदी करण्यासाठी अदानी समूह आणि अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड (Apollo Hospitals Enterprise Ltd) प्रयत्न करत असल्याचे वृत्त 'मिंट'ने दिले आहे.
अदानी समूहाने नुकतीच आरोग्य सेवा क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली होती. त्यासाठी कंपनीने अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेडची स्थापनाही केली आहे.आरोग्य क्षेत्रात उतरण्यासाठी अदानी समूहारकडून काही मोठ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. अदानी समूह सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एचएलएल हेल्थकेयर लिमिटेड (HLL Healthcare Ltd) खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने HLL कंपनीमधील 100 टक्के समभाग विक्री करण्याची घोषणा डिसेंबर 2021 मध्ये केली होती. केंद्र सरकारने ही घोषणा केल्यानंतर केरळ सरकारने ही HLL कंपनी खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्याला केंद्राने मंजुरी दिली नाही.
करार कोणत्या किंमतीवर होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोपोलीससोबतचा करार एक अब्ज डॉलरचा होण्याची शक्यता आहे. मेट्रोपोलीसची सुरुवात 1980 च्या दशकात झाली होती. जवळपास 19 राज्यांमध्ये मेट्रोपोलीसचे डायग्नोस्टिक केंद्र आहेत. देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात मेट्रोपोलीसचा चांगलाच जम आहे.
अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. अदानी समूहाने आंतरराष्ट्रीय सिमेंट कंपनी होल्सिममचा भारतातील सिमेंट व्यवसाय खरेदी करण्याचा करार केला आहे. या करारामुळे अदानी समूहाची सिमेंट बाजारपेठेवरील पकड भक्कम होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- महेंद्रसिंह धोनीची Garuda Aerospace मध्ये गुंतवणूक, बनला कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर
- HDFC Bank : HDFC Bank ग्राहकांना झटका, आजपासून EMI महाग; जाणून घ्या नवे दर
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.