एक्स्प्लोर

Aadhaar Card : आधार कार्ड सोबत बाळगण्याचं टेन्शन मिटलं, नवं अ‍ॅप येणार, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

New Aadhaar APP : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यूआयडीएआयनं नवं अ‍ॅप तयार केल्याची माहिती दिली. त्याची सध्या तपासणी सुरु असून लवकर सर्वसामान्यांसाठी लाँच केलं जाईल.

New Aadhaar APP: यूआयडीएआयकडून जारी करण्यात आलेलं आधार कार्ड आता महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.आधार कार्डचा वापर करणं सोपं व्हावं आणि आधार कार्डचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आधार कार्ड संदर्भात नवं फीचर लाँच करणयात आलं आहे. हे आधारच्या डिजिटलायझेशनं संदर्भातील महत्त्वाचं पाऊल आहे. केंद्रीय मंत्री माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील माहिती दिली. फेस आयडी ऑथेटिकेशन फीचरसह यूआयडीएआयनं अ‍ॅप लाँच केलं आहे. 

नव्यानं लाँच करण्यात येणाऱ्या आधारच्या अ‍ॅपसह एअरपोर्ट आणि हॉटेलमध्ये चेक न करताना आधार कार्डच्या सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी द्यावी लागणार नाही. यूआयडीएआयनं नवं अ‍ॅप विकसित केलं आहे. सध्या लाँच करणयात आलेलं अ‍ॅप बेटा स्वरुपाचं असून तपासणीच्या टप्प्यात आहे. याची चाचणी यशस्वी झाल्यास ते सर्वांसाठी लाँच कलं जाईल. 

आधार कार्डची गरज पडल्यास क्यूआर कोड आणि फेस आयडीच्या द्वारे पडताळणी केली जाईल. या अ‍ॅपमुळं फेस आयडी ऑथेंटिकेशनला डिजिटल पडताळणीला प्रोत्साहन मिळेल. याच्या सुरक्षा  आणि गोपनीयतेसाठी आर्टिफिशअल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे. 

नव्या आधार कार्ड अ‍ॅपमध्ये गोपनीयतेला प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळं वैयक्तिक माहितीचं नियंत्रण यूजरच्या हातात असेल. डेटा शेअरिंगसाठी यूजर्सची मान्यता अपेक्षित असेल, त्यामुळं गोपनीयता कायम राहील. 

फेस आयडी ऑथेंटिकेशन मुळं आता फक्त चेहऱ्याच्या आधारे आधार पडताळणी केली जाईल. यामुळं यूपीआय पेमेंट प्रक्रिया सोपी होईल.

यूआयडीएआयच्या दाव्यानुसार  अ‍ॅप 100 टक्के डिजीटल आणि सुरक्षित असल्यानं यामध्ये डेटा सोबत छेडछा करता येणार नाही. यामुळं डेटा लीक होणार नाही, याचा दुरुपयोग होणार नाही.

डिजिटल इंडिया कार्यक्रमानुसार हे अ‍ॅप पेपरलेस गव्हर्नंसला प्रोत्साह मिळेल. ज्यामुळं आधार कार्डशी संबंधित कामं डिजिटली पूर्ण होतील. 

इतर बातम्या :

धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा, रेपो रेट घटवून 6 टक्क्यांवर आणला, ईएमआय घटणार?

RBI MPC Meeting: 'मी महाभारतातील संजय नाही', ट्रम्प टॅरिफवर आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा असं का म्हणाले? 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget