व्हायचं होतं सैनिक पण झाला गवंडी, आता मिळाली 1.37 लाख पगाराची ऑफर; बदलणार आर्थिक स्थिती
बिहारच्या छपरा येथे राहणारा जितेंद्र कुमार राय हा गवंडीही इस्रायलला जाण्याच्या तयारीत आहे. त्यांना तिथं 1 लाख 37 हजार रुपयांची ऑफर मिळाली आहे.
Business News : गेल्या काही महिन्यांपासून हमाससोबत (Hamas) सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांची गरज आहे. त्यासाठी तिथं कामगार भरतीची प्रक्रिया सुरु आहे. विशेषत: इमारत बांधकामात गुंतलेल्या सर्व प्रकारच्या कामगारांना मागणी आहे. रिक्त पदानुसार तिथे 1 लाख 37 हजार रुपये पगारावर कामगार नियुक्त केले जातील. त्यांचा करार 1 ते 5 वर्षांचा असणार आहे. अशा परिस्थितीत बिहारच्या छपरा येथे राहणारा जितेंद्र कुमार राय (Jitendra Kumar Rai) हा गवंडीही इस्रायलला जाण्याच्या तयारीत आहे. इस्रायलच्या कमाईमुळं त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
सैनिक होण्याचे स्वप्न होते, पण झाले गवंडी
जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते राज्यशास्त्रात पदवीधर आहेत. त्यांनी लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न पाहिले होते. एकदा ते यामध्ये उत्तीर्णही झाले होते. पण अंतिम निवड झाली नाही. ते एका गरीब कुटुंबातून आले होते. पण त्यांना जेव्हा कोणतेही काम मिळाले नाही, तेव्हा त्यांनी गवंडी म्हणून काम करण्याचे ठरवले. अनुभव घेण्यासाठी त्यांनी जमशेदपूर येथील नॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनीत 8 वर्षे काम केले. सध्या ते बिहारमध्येच काम करत आहेत. त्यांच्या ज्ञानामुळं ते छपरा तसेच गोपालगंज आणि सिवान येथे कामाला जातात. कधीकधी ते शांत बसत नाहीत, परंतू, त्यांची कमाई 15 ते 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नाही.
परदेशात कोणत्याही नोकरीत चांगला पगार मिळतो
जितेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात कोणत्याही नोकरीत चांगला पगार मिळतो. त्यामुळेच जेव्हा त्यांना इस्रायलला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा ते इच्छुक झाले. ते आपल्या मुलांना खासगी शाळेत शिकवतात. आता ते इस्रायलला जाणार असल्याने तिथेही त्यांना लाखांहून अधिक पगार मिळणार आहे. अशा परिस्थितीत आपली गरिबी लवकरच दूर होईल, अशी आशा त्यांना वाटत आहे. मी सैनिक बनू शकलो नसलो तरी आता जे काही काम करतोय ते मनापासून करतो, असं जितेंद्र यांनी सांगितलं. दरम्यान, इस्रायलमध्ये रिक्त पदानुसार 1 लाख 37 हजार रुपयांचा पगार दिला जाणार आहे. विविध पदांवर कामगार नियुक्त केले जातायेत. त्यांचा करार 1 ते 5 वर्षांचा असणार आहे. अशा परिस्थितीत बिहारच्या छपरा येथे राहणारा जितेंद्र कुमार राय हा गवंडीही इस्रायलला जाण्याच्या तयारीत आहे.
महत्वाच्या बातम्या: