जगातील 22 देशांनी तोडली 140 कोटी भारतीयांची मने, 'या' निर्णयाचा देशातील जनतेला मोठा फटका
जगातील 22 देशांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं भारतातील 140 कोटी जनतेच्या इच्छा आकाक्षांना मोठा धक्का बसला आहे.
Business News : जगातील 22 देशांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं भारतातील 140 कोटी जनतेच्या इच्छेला मोठा धक्का बसला आहे. हे 22 देश दुसरे तिसरे कोणी नसून OPEC Plus ही 22 देशांची क्रूड ऑइल उत्पादक संघटना आहे. ज्यामध्ये रशियासह सौदी अरेबिया, इराण, इराक यांचा समावेश आहे. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती पाहून, ओपेक प्लसने तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याची आपली योजना पुढे ढकलली आहे. याचा फटका भारतातील 140 कोटी जनतेला बसला आहे.
OPEC Plus मधील 22 देशांच्या निर्णयामुळे भारतातील सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा होती. पण तसे होऊ शकले नाही. OPEC ने तेलाच्या उत्पादनात वाढ केली असती तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा दररोज 1.80 लाख बॅरलने वाढला असता. तसेच त्यामुळं किंमतींमध्ये घसरण दिसली असती. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर झाला असता. दर कमी झाले असते.
तेलाच्या किंमतीत दीड टक्क्यांची वाढ
1 ऑक्टोबरपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्यास ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 65 ते 68 डॉलरच्या दरम्यान येऊ शकते, अशी माहिती तज्ञांनी दिली होती. जर कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलरच्या आसपास आली तर ओपेक प्लस आपली उत्पादन वाढीची योजना पुढे ढकलू शकते असं तज्ञांनी सांगितलं होतं. ओपेक प्लसने ही योजना दोन महिन्यांसाठी पुढे ढकलून चालू स्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस देशांच्या या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत दीड टक्क्यांनी वाढ होत आहे.
OPEC Plus चा नेमका निर्णय काय?
कमी मागणी आणि प्रचंड पुरवठा यामुळे किमती घसरल्यानंतर ओपेकने तेल उत्पादनाचा निर्णय दोन महिन्यांसाठी पुढे ढकलला आहे. संघटनेच्या सदस्यांच्या मते, ओपेक प्लसचे प्रमुख सदस्य ऑक्टोबरमध्ये दररोज 180,000 बॅरलच्या नियोजित वाढीसह पुढे जाणार नाहीत. जगातील सर्वात मोठे ग्राहक चीन आणि अमेरिका यांच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आठवड्याच्या सुरूवातीला, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 73 डॉलरच्या खाली आल्या होत्या, जे 2023 च्या अखेरीस सर्वात कमी पातळी होती. त्यामुळे जगभरात विशेषतः भारतातील क्रूड आयात बिलात घट झाली आहे.
पुरवठा वाढला तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 50 डॉलरपर्यंत घसरणार
सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखाली, ओपेकने जूनमध्ये 2022 पासून थांबलेला पुरवठा हळूहळू पुन्हा सुरू करण्यासाठी रोड मॅप तयार केलाय. पण गरज भासल्यास वाढ थांबवली किंवा कमी केली जाणार आहे. पुरवठा रद्द केल्याने आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी आणि ट्रेडिंग कंपनी ट्रॅफिगुरा ग्रुप सारख्या बाजारातील पर्यवेक्षकांना चौथ्या तिमाहीत अपेक्षित असलेल्या अतिरिक्त क्रूडला रोखता येईल. याउलट, सिटीग्रुप इंकने इशारा दिला होता की जर पुरवठा वाढला तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 50 डॉलरपर्यंत घसरू शकते.
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या
सध्या कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 2 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान ते प्रति बॅरल 74 डॉलरवर पोहोचले आहे. सध्या, भारतीय वेळेनुसार, सकाळी 9:45 वाजता प्रति बॅरल 72.97 डॉलरवर व्यापार होत आहे. मात्र, 2 ते 4 सप्टेंबरपर्यंत ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
महत्वाच्या बातम्या: